पालकमंत्री बावनकुळेंसह भाजपा नेत्यावरील गुन्हे रद्द

08 Oct 2025 11:57:00
अनिल कांबळे
 
 
नागपूर,
chandrashekhar bawankule काेविड काळात राज्य सरकारच्या निर्बंधांचे उल्लंघन करून आंदाेलन करणाèया भाजपाच्या नेत्यांविराेधात सीताबर्डी पाेलिसांनी गुन्हे दाखल केले हाेते. या गुन्ह्यातून सर्व नेत्यांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली आहे. यामध्ये राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांसह काही प्रमुख पदाधिकाèयांचा समावेश आहे.
 
 

chandrashekhar bawankule 
ओबीसींना जनगणनेनुसार 27 टक्के आरक्षण मिळावे तसेच महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे राजकीय आरक्षण हिरावल्याच्या निषेधार्थ 31 मे 2021 राेजी संविधान चाैक परिसरात भाजपने हे आंदाेलन केले हाेते. पाेलिसांनी आंदाेलन दडपले आणि सिताबर्डी पाेलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. आराेपींमध्ये महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. कृष्णा खाेपडे, आ. विकास कुंभारे, आ. प्रवीण दटके, आ. समीर मेघे, माजी आमदार टेकचंद सावरकर, अरविंद गजभिये, रमेश चाेपडे आणि रितेश रामभाऊ रहाटे यांचा समावेश हाेता. त्यांच्याविराेधात भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार सरकारी आदेशाचे उल्लंघन, कलम 269 व 270 नुसार निष्काळजीपणे आणि जाणीवपूर्वक संसर्ग ैलाव, कलम 135 अंतर्गत प्रतिबंध आदेशाचे उल्लंघन, तसेच महाराष्ट्र पाेलिस अधिनियमाच्या कलम 37(1) व 37(3) अंतर्गत जमावबंदी शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. आंदाेलनाचा काळ काेविड-19 महामारीचा हाेता. राज्य सरकारने संसर्ग राेखण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथराेग प्रतिबंधक कायदा 1897 लागू केला हाेता. लाॅकडाऊन लागू असताना हे आंदाेलन झाल्याने वरील कायद्यांनुसार गुन्हे नाेंदविण्यात आले हाेते.
Powered By Sangraha 9.0