चिखली नप प्रभागाचे आरक्षण जाहीर

08 Oct 2025 18:58:23
चिखली
Chikhli municipal council  चिखली नगरपरिषद प्रभागाचे ८ ऑटोंबर रोजी नगर परिषद सभागृहामध्ये उपविभागीय अधिकारी शरद पाटील व नपचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी नगर परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर केले.
 
 
 
Chikhli municipal council reservation
 
 
महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्यानुसार नगरपरिषद सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता नगरपरिषद प्रभागाचे आरक्षण सोडत काढण्याकरिता सभा आयोजित करण्यात आली. चिखली नगर परिषद मध्ये एकूण १४ प्रभागातील २८ जागांमधून अनुसूचित जातीचे ५ जागांच्या आरक्षण काढून त्यामधून ३ महिला सदस्यांचे आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या ८ जागांचे आरक्षण काढून त्यामधून ४ महिला सदस्यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. एकूण २८ जागांपैकी १५ जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या च्या होत्या. त्यामधून ७ महिला सदस्यांचे आरक्षण काढण्यात आले. एकूण २८ जागांमधून १४ जागा महिला सदस्यांसाठी राखीव असल्याने न प मध्ये महिलाराज राहणार आहे.
 
 
 
प्रभाग निहाय आरक्षण
प्रभाग क्रं १ :- (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग. (ब) सर्वसाधारण प्रवर्ग महिला
प्रभाग क्रं २ :- (अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग(ब) सर्वसाधारण प्रवर्ग महिला
प्रभाग क्रं ३ :- (अ) अनुसूचित जाती महिला (ब) सर्वसाधारण प्रवर्ग
प्रभाग क्रं ४ :- (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ब) सर्वसाधारण प्रवर्ग महिला
प्रभाग क्रं ५ :- (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ब) सर्वसाधारण प्रवर्ग
प्रभाग क्रं ६ :- (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ब) सर्वसाधारण प्रवर्ग महिला
प्रभाग क्रं ७ :- (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ब)सर्वसाधारण प्रवर्ग
प्रभाग क्रं ८ :- (अ) सर्वसाधारण प्रवर्ग महिला(ब)सर्वसाधारण प्रवर्ग
प्रभाग क्रं ९ :- (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ब)सर्वसाधारण प्रवर्ग
प्रभाग क्रं १० :- (अ) अनुसूचित जाती (ब)सर्वसाधारण प्रवर्ग महिला
प्रभाग क्रं ११:- (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ब)सर्वसाधारण प्रवर्ग
प्रभाग क्रं १२ :- (अ) अनुसूचित जाती महिला(ब)सर्वसाधारण प्रवर्ग
प्रभाग क्रं १३ :- (अ) अनुसूचित जाती (ब) सर्वसाधारण प्रवर्ग महिला
प्रभाग क्रं १४ :- (अ) अनुसूचित जाती महिला (sc) (ब)सर्वसाधारण प्रवर्ग
 
 
अशा पध्दतीने आरक्षण निघाले आहे.
 
 
नगराध्यक्ष पदाचे आरक्षण यापूर्वी सर्वसाधारण जाहीर झाल्याने नगर परिषदेचे निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली. आरक्षण सोडत वेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0