जगाचे दुःख कमी करण्यासाठी वाल्मिकींनी लिहिले रामायण

08 Oct 2025 21:43:14
-सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
-महर्षी वाल्मिकी जयंत्युत्सव
नागपूर, 
महर्षी वाल्मिकींची महानता आपण सर्व जाणतो. आपल्या जीवनात राम आणणारे तेच आहेत. राम होते व झाले. परंतु घराघरात राम पोहोचले ते महर्षी वाल्मिकींमुळे. त्यांनी रामायण लिहिले व सर्वांपर्यंत पोहचवले. कारण, त्यांच्या मनाची सर्वांना आपली मानणारी होती. जगाचे दुःख दूर व्हावे, यासाठी त्यांनी हे केले. यावर चिंतन करण्याची आवश्यक आहे, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक Dr. Mohanji Bhagwat डॉ. मोहन भागवत यांनी केले. कामठीच्या वाल्मिकी समाज सेवा मंडळातर्फे आयोजित महर्षी वाल्मिकी जयंती सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत प्रमुख अतिथी होते. यावेळी व्यासपीठावर खा. सुमित्रा वाल्मिकी, रघुवंशी, रा.स्व. संघाचे विदर्भ प्रांत सहसंचालक श्रीधर गाडगे, राज्यमंत्री आशीष जयस्वाल उपस्थित होते.
 
 
० ०
 
सरसंघचालक म्हणाले की, महर्षी वाल्मिकींनी दुनियेचे दुःख कमी करण्यासाठी लिहिले व ते सर्वांपर्यंत पोहोचवले. दुनियेतील दुःख दूर करायचे असेल तर ते जादूने दूर होणार नाही. कारण, दुख का निर्माण होते? दुःख आपणच निर्माण करतो. अगदी आपल्या जीवनातही दुःख निर्माण करणारे आपणच आहोत. दोष इतरांना देतो. पण कुठेतरी, आपलेच कर्म आपल्याला खाते. आपल्या मनात स्वार्थ, भेद आहे. आपण कोणत्याही नियमांचे पालन करत नाही. आपण स्वतःला वेगळे व श्रेष्ठ मानतो, इतरांना कनिष्ठ मानतो. या बाबी मनाच्या अहंकारामुळे उत्पन्न होतात. यामुळे जीवनात दुःख असतेे. जो अहंकारी नाही, जो नफ्या-तोट्याची पर्वा करीत नाही, यश-अपयश, जय-पराजय, मान-अपमान, यापासून दूर राहून कुठल्याही परिस्थितीत माणसासारखा वागतो, सर्वांना स्वतःशी जोडत एकच आहोत असे मानून वागतो, तो स्वतः सुखी असतो.
 
 
रामायण काल्पनिक कथा नाही. हा ग्रंथ आपल्याला सांगतो की, त्या काळात प्रत्यक्ष राजा राम होते. रामाची अनेक रूपे आहेत. रामायणात, एका आदर्श कुटुंबाचेही मिळते. रामायणातील पात्रे राम व रावणाच्या कुटुंबातील वेगवेगळी, अगदी परस्परविरोधी असली तरी एक-दुसर्‍याशी आचरणाची मूल्ये सारखीच आहेत. राम आपल्याला सांगतो की, आपण वैयक्तिकरित्या कसे जगले पाहिजे. रामायण आपल्याला सांगते आपण आपल्या कुटुंबात एकमेकांशी कसा संवाद साधला पाहिजे. वाल्मिकींच्या रामायणात जीवनाच्या प्रत्येक पैलूसाठी आचारसंहितेचे मार्गदर्शन आहे. सरसंघचालक जी Dr. Mohanji Bhagwat  म्हणाले की, ८ हजार वर्षांपूर्वीचे होते. त्यांनी पाहिलेले स्वप्न प्रयत्न, संयम, चिकाटी, कठोर परिश्रमाने साकार करू शकतो व करायला हवा. मानवतेप्रति हे आपले कर्तव्य आहे. कारण आपण भारतीय आहोत. ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. ती पुढे नेणे आपले कर्तव्य आहे.
Powered By Sangraha 9.0