सोन्याचा भाव चढला; दिवाळीत गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला

08 Oct 2025 11:52:38
नवी दिल्ली,
Gold prices today सोन्याच्या बाजारात आज ऐतिहासिक वाढ नोंदवण्यात आली असून, प्रति तोळा सोन्याची किंमत ₹1,23,000 च्या पुढे पोहोचली आहे. हा दर आजवरचा सर्वाधिक ठरला असून, सोन्याने आज सर्वकालीन उच्चांकाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत आणि गुंतवणूकदार यामुळे सोन्याकडे आकर्षित होत आहेत. जागतिक बाजारात आर्थिक मंदीचे सावट, वाढती महागाई आणि आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्यामध्ये गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या किंमतीत झालेली वाढ गुंतवणूकदारांसाठी विशेष महत्वाची ठरली आहे. बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या परिस्थितीनुसार सोन्याचे दर वाढतात किंवा घटतात, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी किंमतींची माहिती असणे गरजेचे आहे.
 

Gold prices today
आज भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹12,332 इतकी आहे. 8 ग्रॅम सोन्याचे भाव ₹98,656, 10 ग्रॅमचे ₹1,23,320 तर100 ग्रॅमचे ₹12,33,200 इतके आहेत. 22 कॅरेट सोन्याची किंमत आज प्रति ग्रॅम ₹11,305 असून, 8 ग्रॅम ₹90,440, 10 ग्रॅम ₹1,13,050 आणि 100 ग्रॅम ₹11,30,500 इतके आहेत. 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹9,253 असून, 8 ग्रॅम ₹74,024, 10 ग्रॅम ₹92,530 आणि १०० ग्रॅम ₹9,25,300 इतकी आहे. दरम्यान, चांदीच्या बाजारातही किंमतीत स्थिरता दिसत आहे. आज चांदीची किंमत प्रति ग्रॅम ₹157 तर प्रतिकिलो ₹1,57,000 इतकी आहे. सोन्याच्या या ऐतिहासिक वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंद असून, दिवाळीच्या सणासोबतच सोन्याच्या बाजारात नवा उत्साह पाहायला मिळत आहे.
Powered By Sangraha 9.0