दोन नप, पाच नपं सदस्यपदांचे आरक्षण जाहीर

08 Oct 2025 19:30:02
गोंदिया,
Gondia municipal राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रभाग रचना प्रसिद्धीनंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे सर्वांचे लक्ष सदस्यपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले होते. आज, ८ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा नगर परिषद त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर ५ नगरपंचायत सदस्यपदाची आरक्षण सोडतही काढण्यात आली. ज्यामध्ये निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांमध्ये ‘कही खुशी, कही गम’चे वातावरण दिसून आले.
 

Gondia municipal 
जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा नगर परिषद तसेच गोरेगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच जिल्हा प्रशासन कामाला लागले होते. तर निवडणूक लढण्यास इच्छूक राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार तयारीला लागले होते. अशात प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यावर ६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील नप व नपंच्या नगराध्यक्षपदाची सोडत काढण्यात आली. त्यानंतर सर्वांचेच लक्ष सदस्यपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले होते. आज, ८ ऑक्टोबर रोजी गोंदिया व तिरोडा नगर परिषद व ५ नगरपंचायत सदस्यपदाची आरक्षण सोडतही काढण्यात आली. यावेळी संबंधित अधिकारी वर्ग, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, प्रतिनिधी, इच्छूक उमेदवार उपस्थित होते. दरम्यान, गोंदिया नगर परिषदेतील २२ प्रभागाच्या ४४ सदस्यपदासाठी सोडत काढण्यात आली. यात प्रभाग क्र. ८, १०, १६, ७, २१, २२, ९, १८, १ अनुसूचित जातीसाठी ९ जागा आरक्षित करण्यात आल्या असून प्रत्येक प्रभागात एक जागेवर महिलेला संधी देण्यात आली आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी प्रभाग क्र. २, ३, ४, ५, ६, ११, १२, १३, १४, १७, १९ व २० अशा १२ जागा आरक्षित करण्यात आले असून प्रत्येक प्रभागात एक महिला जागा आरक्षित आहे. तर अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्र. १ आरक्षित असून येथेही एका महिलेला संधी राहणार आहे.
 
 
तिरोडा नगर परिषदेत १० प्रभागातून २० सदस्य निवडून द्यायचे आहेत. येथेही प्रत्येक प्रभागात एक सदस्यपद महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्र. १ व २ मध्ये अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. ३ व ९ अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्र. ४ व ५ नामाप्र व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. ६, ७, व ८ नामाप्र महिला व सर्वसाधारण आणि प्रभा क्र. १० अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे.
 
 
गोरेगाव नगरपंचायत आरक्षण...
 
 
गोरेगाव नगर पंचायतच्या १७ प्रभागासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात प्रभाग क्र. १, २, ६, ९ खुला प्रवर्ग, प्रभाग क्र. ३, ७, १६ व १७ खुला प्रवर्गातील महिला, प्रभाग क्र. ४ अनुसूचित जमाती व प्रभाग क्र. ८ अनुसूचित जमाती महिला, प्रभाग क्र. १४, १५ नामाप्र आणि प्रभाग क्र. ५, ११ व १२ नामाप्र महिला, प्रभाग क्र. १३ अनुसूचित जाती व प्रभाग क्र. १० अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे.
Powered By Sangraha 9.0