अबब.. तब्बल ४०० कोटी रुपयांचे नुकसान!

08 Oct 2025 12:37:59
मुंबई,
Hrithik Roshan अभिनेता ऋतिक रोशन याच्या ‘फाइटर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मध्यम प्रतिसाद मिळवला, तर ‘वॉर 2’कडून खूप अपेक्षा असतानाही ती चित्रपटगृहात अपयशी ठरली. तब्बल ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये तेलगू अभिनेता जूनियर एनटीआरची उपस्थितीही काही विशेष कामाला आली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर ऋतिक रोशनने आता नवा मार्ग स्वीकारला आहे – निर्माता होण्याचा.
 

Hrithik Roshan 
, ऋतिक रोशन लवकरच अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ साठी एक वेबसीरिज तयार करणार असून ही मालिका तो स्वतः निर्मित करत आहे. या मालिकेद्वारे ऋतिकच्या ‘HRX फिल्म्स’ या निर्मिती संस्थेची अधिकृत सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, या मालिकेत ऋतिकची खास मैत्रीण सबा आजाद प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
 
 
 
 
याशिवाय Hrithik Roshan अभिनेत्री अलाया फर्निचरवाला आणि ज्येष्ठ अभिनेता आशीष विद्यार्थी हे देखील या मालिकेचा भाग असतील. आशीष विद्यार्थी यांच्या अभिनयाचा अनुभव ही मालिकेची एक खास जमेची बाजू ठरणार आहे. या वेबसीरिजचं दिग्दर्शन अजित पाल सिंह  करणार असून, ही एक सामाजिक थरारक (social thriller) मालिका असणार आहे.सध्या ही मालिका पूर्व-निर्मितीच्या (pre-production) टप्प्यावर आहे. या वर्षाच्या अखेरीस चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. ऋतिक या प्रकल्पासाठी पूर्ण वेळ देणार असून, त्याच्या कल्पनेप्रमाणे ही मालिका आकाराला यावी, यासाठी तो स्वतः सर्व बाबींचं बारकाईनं निरीक्षण करणार आहे.
 
 
HRX फिल्म्स म्हणजे काय?
 
 
‘HRX फिल्म्स’ ही ऋतिक रोशनची स्वतःची निर्मिती संस्था आहे. याची सुरुवात २०१९ साली झाली असली, तरी या नव्या वेबसीरिजद्वारे तो प्रथमच निर्मात्याच्या भूमिकेत समोर येणार आहे. ही मालिका अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असून, डिजिटल माध्यमात ऋतिकचा हा पहिलाच निर्मिती प्रकल्प असेल.याचबरोबर ऋतिक रोशन लवकरच आपल्या बहुप्रतीक्षित ‘कृष ४’ या चित्रपटाचाही आरंभ करणार असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन तो स्वतः करणार आहे. त्यामुळे अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशा तिहेरी भूमिकांमध्ये ऋतिक बॉलिवूडमध्ये नव्या पर्वाची सुरुवात करत आहे.प्रेक्षकांच्या आणि चित्रपटसृष्टीतील साऱ्यांच्या नजरा आता ऋतिकच्या या नव्या वेबसीरिजवर लागल्या आहेत. ‘HRX फिल्म्स’च्या या पहिल्याच प्रकल्पाला काय प्रतिसाद मिळतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0