निसर्ग वाचवण्यासाठी माणसांनी गरजा कमी कराव्यात !

08 Oct 2025 18:06:29
कारंजा लाड, 
mansi karandikar आपल्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तूसाठी लागणारा कच्चामाल हा आपल्याला निसर्गापासून मिळत असतो. अशा वस्तूंच्या निर्मितीसाठी आपल्याला झाडे, खनिजे, समुद्र, इंधन, या नैसर्गिक साधनांचा वापर करावा लागतो.त्यामुळे निसर्गातील वस्तूंचा र्‍हास होत असतो. पर्यायाने निसर्ग निसर्गाचे खूप नुकसान होत असते, म्हणून आपल्याला निसर्ग वाचवायचा असेल तर आपल्या गरजा कमीत कमी कराव्या लागतील, असे मत पर्यावरण तज्ञ केतकी घाटे व मानसी करंदीकर यांनी व्यक्त केले. त्या नानासाहेब दहीहांडेकर प्रांगणात सुरू असलेल्या व्याख्यानमालेत बोलत होत्या.
 
 

करंदीकर  
 
 
पृथ्वीची गोष्ट हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रारंभी राजश्री गहाणकरी, डॉ. स्नेहा देशपांडे, डॉ. अमोल उगले, विनय कोडपे, पवन मिश्रा यांनी वत्यांचे स्वागत केले. गिरीश जिचकार यांनी परिचय करून दिला. यावेळी पृथ्वीच्या उत्क्रांतीचा अद्भूत इतिहास सांगताना घाटे म्हणाल्या की, ४५० कोटी वर्षांपूर्वीची ही पृथ्वी सुरुवातीला सूर्याभोवती वेगाने फिरत होती. नंतर काही उल्कापात झाल्याने तिचा वेग मंदावला, नंतर पृथ्वीला चंद्र मिळाला, पाणी उपलब्ध झाले, काही काळाने एक पेशीय व बहुपेशीय जीव निर्माण झाले, नंतर मासे, झाडे, उभयचर व सरपटणारे प्राणी, डायनासोर, पशुपक्षी, गवत आले आणि नंतर होमो सेपियन म्हणजे घर करून राहणारा सस्तन प्राणी जन्मास आल्याचे त्यांनी सांगितले.
तर दुसर्‍या व्याख्यात्या मानसी करंदीकर म्हणाल्या की, आम्ही ओईकोस या पर्यावरणीय संस्थेच्या माध्यमातून पूर्ण वेळ काम करतो. गेल्या वीस वर्षात वैयक्तिक मालकीच्या जमिनीवर जंगल पुनर्जीवनाचे प्रयोग आम्ही केलेले आहे. या जमिनीवर विविध देशी झाडे व पशु, पक्षी, कीटक आकर्षित होतील अश्या वनस्पतीची लागवड केली. त्यामुळे तेथे कीटक, सरडा, साप, जळू विविध पक्षी, फुलपाखरे यासारखे प्राणी आम्हाला दिसायला लागले.mansi karandikar म्हणजे पूर्वीपेक्षा येथे खूप पर्यावरणीय बदल झाल्याचे आम्हाला दिसले. निसर्गाला वाचवायचे असेल तर असे प्रकल्प मोठया प्रमाणात उभे केले तरच पशु पक्ष्यांनी हा निसर्ग बहरुन जाईल. आणि पुन्हा हे सृष्टीचक्र पूर्ववत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रफुल्ल वानखडे यांनी केले तर निशिकांत परळीकर यांनी शारदा स्तवन गायले.
Powered By Sangraha 9.0