कीव,
indian-citizen-arrested-in-ukrain गेल्या काही दिवसांपासून युक्रेन-रशिया युद्ध पुन्हा गंभीर स्वरूपात सुरू आहे. या संघर्षाची झळ संपूर्ण जगाला भासत आहे. नाटो देशांनीही या युद्धात थेट हस्तक्षेप केला आहे. युद्ध अधिक पेटताना दिसत असून, काही दिवसांपूर्वीच रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सांगितले की, ते फक्त युक्रेनच नव्हे तर संपूर्ण नाटो देशांशीही युद्ध लढत आहेत.

नाटो देश युक्रेनला लष्करी मदत करत आहेत. रशियावर आर्थिक आणि राजकीय दबाव आणण्यासाठी भारत आणि चीनवरही तेल खरेदी न करण्यासाठी दबाव आहे. भारताने आधीच रशियाला स्पष्ट सांगितले आहे की, युक्रेनवरील युद्धात भारतीय नागरिकांचा समावेश करू नये. मात्र, काही भारतीय नागरिक रशियन सैन्यात सामील झाले आहेत आणि युक्रेनविरोधी युद्धात लढत आहेत. यापैकी एका २२ वर्षीय भारतीय नागरिकाला युक्रेनियन सैन्याने अटक केली आहे. indian-citizen-arrested-in-ukrain तो रशियाकडून युक्रेनविरोधात लढत होता. अटक केलेल्या युवकाचे नाव माजोती साहिल मोहम्मद हुसेन असून, तो गुजरातमधील मोरबीचा रहिवासी आहे. युक्रेनच्या सैन्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या कीवमधील भारतीय दूतावास या घटनेची सत्यता तपासत आहे.
सौजन्य : सोशल मीडिया
युक्रेनियन आर्मीच्या ६३ व्या मेकॅनाइज्ड ब्रिगेडने एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, साहिल रशियातील एका विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी भारतातून आला होता. व्हिडिओमध्ये तो रशियन भाषेत बोलताना दिसतो आणि सांगतो की, त्याला ड्रग्जशी संबंधित गुन्ह्यासाठी सात वर्षांची शिक्षा झाली होती. indian-citizen-arrested-in-ukrain तुरुंगात असताना त्याला रशियन सैन्यात भरती होण्याची ऑफर देण्यात आली, ज्याद्वारे त्याला शिक्षा टाळता येऊ शकते, आणि त्याने ती स्वीकारली. पण नंतर त्याचा रशियन सैन्यातील अधिकाऱ्यांशी वाद झाला आणि साहिल युक्रेनसमोर आत्मसमर्पण करावा लागला. भारतीय दूतावास या प्रकरणाची अधिक माहिती मिळवण्यासाठी कार्यरत आहे.