जळगाव,
jalgaon-womans-ashes-stolen महाराष्ट्रातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून, कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. हाच प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे, जळगावमध्ये धक्कादायक प्रकार घडल्याचे वृत्त समोर आले आहे. मेहरूण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थी चोरीस गेलेल्या आहेत.
मृत महिलेचे नाव छबाबाई पाटील असून, अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या डोके, हात आणि पायाच्या अस्थी चोरी झाल्या आहेत. jalgaon-womans-ashes-stolen प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलेच्या कुटुंबियांनी असा आरोप केला आहे की, अस्थी अंगावर असलेले सोन काढण्यासाठी चोरी केली गेली. कुटुंबीयांनी भावनिक आवाहन करत म्हटले, "सोन नको, फक्त अस्थी परत करा." या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ माजली असून, पाटील कुटुंबीयांनी महापालिकेच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.