दिवाळीत फिरण्याचे नियोजन करताय..

08 Oct 2025 19:15:32
गोंदिया,
MSRTC अवघ्या काही दिवसांवर आलेली दिवाळी आणि सुट्टीचा हंगाम लक्षात घेता, एसटी महामंडळाने पर्यटनासाठी मोठी संधी उपलब्ध केली आहे. तीर्थस्थळे, पर्यटनस्थळे आणि अन्य प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याची नागरिकांची आवड लक्षात घेता आवडेल तेथे प्रवास योजनेच्या भाडेदरात किमान २२५ ते कमाल १ हजार २५४ रुपयांपर्यंत मोठी कपात केली आहे.
 

MSRTC  
राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याची मुभा दिली आहे. जानेवारी २०२५ पासून जवळपास १५ टक्के भाडे वाढ लागू झाल्यानंतर, आगामी दिवाळी सुट्ट्यांच्या कालावधीसाठी १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. राज्यातील पूरस्थिती लक्षात घेता महामंडळाने हंगामी दरवाढ रद्द केली. यामुळे ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेअंतर्गत प्रवास करणार्‍या प्रवाशांनादेखील याचा लाभ मिळणार आहे. प्रौढ आणि मुलांसाठी चार दिवस आणि सात दिवस अशा स्वरूपात पास आहेत. महामंडळातील साधी, जलद, रातराणी, शिवशाही, ई-शिवाई, शिवनेरी अशा सर्व बसगाड्यांमध्ये योजनेतील पास ग्राह्य आहे. या पासवर अमर्यादित प्रवासाची मुभा प्रवाशांना आहे. ही सवलत साधी, जलद, रात्रसेवा, शिवशाही, आंतरराज्य बस प्रवासाठी राहणार आहे.
 
 
 
 
आवडेल तेथे प्रवास सवलत योजनेत फेब्रुवारीमध्ये दरवाढ करण्यात आली होती. परिणामी या योजनेला प्रवाश्यांकडून कमी प्रतिसाद मिळत होता. प्रवाश्यांमध्ये नाराजीही होती, दरवाढ कमी करण्याची मागणी सातत्याने होती, एसटीने ७ ऑक्टोबर रोजी साडेबाराशे रुपयांपर्यंत दर कपात केली आहे, प्रवाश्यांनी योजनेचा लाभ घ्यावा.
- यतिष कटरे
आगार व्यवस्थापक, गोंदिया
 
 

साधी, जलद, रात्रसेवा, शिवशाही व आंतरराज्य बस सेवा

प्रकार (Type)जुने दर (₹)नवे दर (₹)
४ दिवसांचा पास (प्रौढ)₹1,814₹1,364
४ दिवसांचा पास (मुले)₹910₹685
७ दिवसांचा पास (प्रौढ)₹3,171₹2,382
७ दिवसांचा पास (मुले)₹1,588₹1,194
 

शिवशाही आसनी बस सेवा (आंतरराज्यसह)

प्रकार (Type)जुने दर (₹)नवे दर (₹)
४ दिवसांचा पास (प्रौढ)₹2,533₹1,818
४ दिवसांचा पास (मुले)₹1,261₹911
७ दिवसांचा पास (प्रौढ)₹4,429₹3,175
७ दिवसांचा पास (मुले)₹2,217₹1,590
 
Powered By Sangraha 9.0