लकी पिंपळकरला राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक

08 Oct 2025 15:05:15
नागपूर,
Debate Competition दीक्षाभूमी येथील सुप्रसिद्ध डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या कला शाखेतील इयत्ता बारावीचा विद्यार्थी लकी पिंपळकर याने राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. ही स्पर्धा केसरीमल पोरवाल महाविद्यालय, कामठी येथे पार पडली. "टॅरिफपासून वाचण्याचा स्वदेशी हा एकमेव पर्याय आहे" या विषयावर लकीने प्रभावीपणे आपले विचार मांडत परीक्षकांची मने जिंकली.

Debate Competition
लकी पिंपळकरच्या या यशाचे कौतुक परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर, उपप्राचार्या हर्षा बोरकर, पर्यवेक्षक प्रा. कुणाल पाटील, कला आणि वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. विकास सिडाम आणि सर्व प्राध्यापकवृंदांनी केले. Debate Competition लकीने आपल्या यशाचे श्रेय प्रा. विकास सिडाम, प्रा. सतीश कर्पे आणि प्रा. जोईता रॉय यांना दिले असून, त्याच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सौजन्य : प्रफुल ब्राम्हणे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0