नाटक ‘मुक्तिवीर’ने प्रेक्षकांचा रोमांच वाढवला

08 Oct 2025 19:42:39
नागपूर,
Suresh Bhat Auditorium चतुर्थकालातील पौराणिक पार्श्वभूमीवर आधारित मुनिश्री देशभूषण आणि कुलभूषण यांच्या जीवनावर आधारित नाटक ‘मुक्तिवीर’ मंगळवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात सादर झाले. अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेतर्फे आयोजित या नाटकात प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती. डॉ. रवींद्र भुसारी लिखित आणि प्रमोद भुसारी दिग्दर्शित या गीत-संगीतप्रधान नाटकात ४० कलाकारांचा सहभाग होता. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण जैन समाजासाठी विशेष आयोजन करण्यात आले. दीप प्रज्वलन रमेश तुपकर, भरतेश नखाते, राजेश गडेकर, नितीन नखाते, डॉ. रवींद्र भुसारी यांच्यासह इतरांनी केले.
Suresh Bhat Auditorium 
 
गीतकार डॉ. रवींद्र भुसारी यांच्या गीतांना राजेश तितरमारे यांनी संगीत दिले, तर स्वरसाज श्रुती पांडवकर, मनीष मोहरील आणि मोरेश्वर निस्ताने यांनी दिला. Suresh Bhat Auditorium नृत्यदिग्दर्शन चिन्मय देशकर आणि जिया खंडेलवाल यांचे होते. मुख्य भूमिकांमध्ये देशभूषण: अभिलाष भुसारी, कुलभूषण: रौनक पळसापुरे, राजा: प्रमोद भुसारी, महाराणी: डॉ. सुचित्रा भुसारी, राजकुमारी कमलावती: अस्मिता पाटील यांचा समावेश होता. तसेच अनेक बालकलाकार व गावकऱ्यांनी रंगतदार अभिनय सादर केला.
 
सौजन्य: डॉ. रवींद्र भुसारी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0