बुलढाणा,
On Attack On Chief Justice नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती वी.आर.गवई यांच्या न्यायदानाच्या कक्षामध्ये न्यायदानाचे कामकाज सुरु असतांना न्यायदान कक्षामध्ये एक माथेफिरु वकील राकेश रघुराज किशोर यांनी न्यायमुर्तीवर जोडा भिरकावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा प्रयत्न यशस्वी होवू शकला नाही. तात्काळ माथेफिरु वकीलाला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या दुर्देवी व निंदनीय घटनेचा बुलढाणा जिल्हा वकील संघ यांनी तीव्र शब्दात निषेध करून कृत्य करणा-या माथेफिरु वकीला विरुध्द योग्य ती न्यायीक व फौेजदारी कारवाई करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात येवून सदर ठराव हा एकमताने पारीत करण्यात आला तसेच जिल्हाधिकारी यानां दि. ८ ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती बी. आर. गवई यांनी वकीला विरुध्द कोणतीही कारवाई न करता मनाचा मोठेपणा दाखवत व पदाची गरीमा कायम ठेवत त्यांना सोडून देण्यास सांगितले, निश्चीतच सदर भूमीका ही त्यांचे सर्वोच्च पदाला शोभनीयच आहे. तरी सुध्दा सदर माथेफिरु वकीलाने अर्विभावात मी माफी मागणार नाही किंवा माफी मागण्याचा प्रश्नच उदभवत नाही, मला याचा पश्चाताप नाही अशाप्रकारे उर्मटपणे बोलून गैरकृत्याचे समर्थनच केले. निंदर्यनय कृत्याचा व घटनेचा तिव्र शब्दात विरोध व निषेध करीत व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनद्वारे शासनामार्फत कळवाव्यात. दि. ७ रोजीच्या बुलढाणा जिल्हा वार असो. बुलढाणा यांचे ठरावाची प्रत अवलोकनार्थ जोडली आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्हा वकील संघ जिल्हाध्यक्ष अॅड. विजय सावळे, सचिव अॅड. अमर इंगळे, अॅड. शरद राखोंडे, अॅड. नंदकिशोर साखरे, अॅड. राठोड, अॅड. खरात, अॅड. देशमुख, अॅड.जाधव, अॅड. सुरडकर, अॅड. देवकर, अॅड. दाभाडे, यासह सर्व सदस्यांनी निवेदन दिले.