पुलगावात नगराध्यक्षांसह १० प्रभागांमधून ११ महिला नगरसेवक

08 Oct 2025 19:55:53
पुलगाव, 
pulgaon-municipal-council-election : पुलगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज ८ रोजी नगरपरिषद मुख्य सभागृहात प्राधिकृत अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी संजीव भावे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी विजय आश्रम यांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय आरक्षणासाठी ईश्वरी चिठ्ठी सर्वांच्या समक्ष काढण्यात आली व जाहीर करण्यात आली. प्रभागनिहाय आरक्षणाचे निकाल लागताच इच्छुक उमेदवार पूर्णपणे सक्रिय झाल्याचे दिसून आले. पुलगाव नगरपरिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव असून हे थेट जनतेतून निवडले जाईल. तसेच ११ महिला नगरसेविका असतील त्यामुळे नगर पालिकेत पुढील पाच वर्ष पुलगाव नगरपरिषदेत १२ महिलांचा राज असणार आहे.
 
 
 

jlkj 
Powered By Sangraha 9.0