पुसद नप अध्यक्ष निवडणूक

08 Oct 2025 19:50:23
- उमेदवार नाईक की नाईकेतर ?

रवी देशपांडे
पुसद, 
आगामी Pusad Municipal Council Election  पुसद नगर परिषदेची अध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे नाईक की नाईकेतर उमेदवार राहील, कळीचा मुद्दा आहे. सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री आणि पुसदचे थोर सुपुत्र वसंतराव नाईक हे थेट जनतेतून १९४६ साली नप अध्यक्षपदी निवडून आले होते. त्यानंतर दुसर्‍यांदा थेट जनतेतून निवडून येण्याचा बहुमान पापालाल जैस्वाल यांना लाभला. त्यांनी सहकार क्षेत्रातील दिग्गज श्रीरामआप्पा आसेगावकर यांचा पराभव केला होता.
 
 
pushad
 
त्यानंतर थेट जनतेतून निवडून येण्याचा मान विश्वनाथसिंह बयास यांना मिळाला. त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब अत्रे यांचा पराभव केला होता. नगर परिषद प्रशासकीय काळाच्या अगोदर थेट जनतेतून झालेल्या Pusad Municipal Council Electionनिवडणुकीत अनिता मनोहर नाईक यांनी भाजपाच्या अर्चना अश्विन जयस्वाल यांचा पराभव केला होता.
 
 
Pusad Municipal Council Election आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नप अध्यक्षपदाचा उमेदवार नाईक की नाईकेतर राहणार चर्चा आहे. याचे कारण असे की, नाईक परिवारातील एक व्यक्ती राजकारणात खूपच सक्रिय आहेत. कुठलीही सभा असो की बैठक, राजकीय असो की सामाजिक तसेच कुठलीही घटना असो नाईक परिवारातील ही व्यक्ती हजेरी लावतेच. त्यामुळे थेट जनतेतून अध्यक्षपदाची निवडणूक असल्याने नाईक परिवार ही संधी सोडणार नाही. दरम्यान, पुसदच्या सत्तेत आपणासही मिळावा अशी नाईकेतर कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा संचही आहे. १९५२ पासून नाईक परिवारातील व्यक्तीलाच विधानसभेवर पाठविण्यात येत आहे. तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेत नाईकेतरांना का संधी नको, असे विचारल्या जात आहे.
Powered By Sangraha 9.0