यंदा १.५६ लाख हेटरमध्ये रबीचे नियोजन

08 Oct 2025 19:44:02
वर्धा,
rabi crop खरीप हंगामात अतिवृष्टी व रोगांमुळे पिकांना फटका बसल्यानंतर आता शेतकर्‍यांनी रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. कृषी विभागानेही रबीचे नियोजन केले असले तरी दरवर्षी जिल्ह्यातील रबी हंगामातील पेरणी क्षेत्र कमी होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
 

rabi crop 
सन २०२३-२४ मध्ये १८०८२० हेटर क्षेत्रात रबी पिकांची पेरणीचे नियोजन होते. त्यानंतर सन २०२४-२५ मध्ये हे क्षेत्र २०६११ हेटरने कमी होऊन १६०२०९ हेटर झाले. यंदा २०२५-२६ साठी हे नियोजन पुन्हा कमी होऊन १५६०६४ हेटर झाले आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा ४ हजार १४५ हेटरने पेरणी क्षेत्राने घट झाली आहे.एका बाजूला शासन व प्रशासन सिंचन क्षेत्र वाढवण्याच्या घोषणा करत असले तर दुसरीकडे रबी हंगामातील पेरणी संदर्भात शेतकर्‍यांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत २४ हजार ७५६ हेटरने रबी पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. यामध्ये गहू पिकाचे क्षेत्र सर्वाधिक घटले असून चण्याच्या क्षेत्रातही काही प्रमाणात घट झाली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे. सलग तीन वर्षे खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. यंदाही अतिवृष्टीमुळे पिकांवर विपरित परिणाम झाले आहे. तर कापसाच्या उत्पादनातही यंदा घट येण्याची शयता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील गहू पिकाचे पेरणी क्षेत्र दरवर्षी झपाट्याने घटते आहे. दोन वर्षांपूर्वी गहूचे क्षेत्र ५९७८० हेटर होते. मागीलवर्षी ते ४१ हजार ५०० हेटर झाले आणि यंदा ते पुन्हा कमी होऊन ४१ हजार ८० हेटर राहिले आहे. दोन वर्षांत गहूच्या लागवड क्षेत्रात १८ हजार ७६० हेटरची घट झाली आहे.
 
 

२ वर्षांत हरभर्‍याचे लागवड क्षेत्र ७१०० हेटरने घटले
दोन वर्षांपूर्वी १ लाख १३ हजार ६९० हेटर क्षेत्रावर हरभर्‍याची पेरणी झाली होती. गतवर्षी ते ३ हजार १९० हेटरने कमी होऊन १ लाख १० हजार ५०० हेटर राहिले. यंदा पुन्हा ४ हजार हेटरने घट होऊन ते १ लाख ६ हजार ५०० हेटर इतके झाले आहे. एकूणच दोन वर्षांत हरभर्‍याच्या लागवड क्षेत्रात ७ हजार १०० हेटरची घट झाली आहे.
Powered By Sangraha 9.0