एक तास वाहतूक ठप्प
आर्णी,
यावर्षी अतिवृष्टी झाल्याने शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे 'Rasta Rokho' andolan शेतकर्यांच्या न्याय्य हक्कांसाठी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वात शेतकर्यांनी नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा फाटा येथे रस्ता रोखोे आंदोलन केले. शेतकर्यांचे हे आंदोलन एक तास चालले. त्यामुळे दोन्ही बाजूंची ठप्प झाली होती. शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी सोयाबीन व पराटीची झाडे घेऊन बसले होते. तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी शेतकर्यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली
.
'Rasta Rokho' andolan यावेळी त्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकर्यांना हेक्टरी रुपये ५० हजार इतकी आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना कर्जमुक्त करावे. पीकविम्याचे कठीण निकष तातडीने करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला ठेवत विमारक्कम त्वरित शेतकर्यांच्या खात्यात जमा करावी. अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना, जुने निकष न लावता, योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा, या मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी उबाठा शिवसेनेचे रमेश ठाकरे, लक्ष्मण पठाडे, पंकज शिवरामवार, आनंद शिंदे, सदाशिव धाये, रवी गायकवाड, पवार यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. यावेळी येथे ठाणेदार निलेश सुरडकर यांनी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला होता.