सराईत गुन्हेगार शिरपूर पोलिस कोठडीतून फरार

08 Oct 2025 18:32:40
शिरपुर जैन,

Shirpur police escape ७ ऑटोबर रोजी रात्री ११:३० वाजताच्या दरम्यान सराईत गुन्हेगार शिरपूर पोलिस स्टेशनच्या कोठाडीतून मधून फरार झाल्याने परिसरात व पोलिस स्टेशन क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
 

 Shirpur police escape 
याबाबत सविस्तर असे की, पोलिसांना विविध गुन्ह्यात हवा असलेला सराईत गुन्हेगार गोपाल विजय पवार रा. पांगरखेडा यास ७ ऑटोबर ला शिरपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक करून पोलिस कोठडीत ठेवले होते. यावेळी कर्तव्यावर पोकॉ अमोल घायाळ, विश्वास घोडे हे होते. रात्री दरम्यान ११:३० वाजता आरोपी गोपाल विजू पवार यास शौचास लागली असल्याची त्याने कर्तव्यावरील कर्मचार्‍यास सांगितले त्यांनी त्याला पोलिस स्टेशनच्या परिसरात असलेल्या शौचालयाच्या जवळ नेले असता त्याने पोलिस कॉन्स्टेबल अमोल घायाळ यांच्या हाताला झटका देऊन पोलिस स्टेशनचा आवारातून पसार झाला. सदर आरोपीस उपस्थित कर्मचारी अमोल घायाळ व परिसरातील इतर तरुणांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अंधाराचा व परिसरातील शेत शिवाराचा फायदा घेत पळून जाण्यास यशस्वी झाला.
सदर सराईत आरोपी हा विविध ठाण्यात अनेक प्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे समजते. वाशीम व शिरपूर पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी शोध पथके तयार केली असून, पथके गुन्हेगाराचा शोध घेत आहे. या घडलेल्या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
Powered By Sangraha 9.0