दिवाळीच्या हंगामात मिठाईत भेसळ कशी ओळखाल?

08 Oct 2025 17:05:44
sweets during Diwali season सणांच्या दिवसात काळात बाजारात मिळणाऱ्या तूप, खवा, पनीर आणि मिठाईमध्ये भेसळ असण्याचा धोका वाढतो. करवा चौथनंतर देशभारात दिवाळीची तयारी सुरू होते आणि लोक घरी दूध, खवा, पनीर वापरून गोड पदार्थ बनवतात किंवा बाजारातून मिठाई खरेदी करतात. मात्र या सणांच्या हंगामात वाढलेल्या मागणीमुळे अनेकदा या पदार्थांमध्ये बनावट साहित्य मिसळले जाते. त्यामुळे अशा उत्पादनांचा वापर विषारी ठरू शकतो, म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
 

sweets during Diwali season 
 
खवा आणि पनीर बनावट आहे की नाही हे ओळखण्यासाठी हातात घासून पाहता येते. जर खवा घासल्यावर जास्त तेल सोडत असेल, तर तो नकली आहे. खऱ्या खव्याचा रंग हलका तपकिरी आणि त्याचा गोडवा व सुगंध नैसर्गिक असतो, तर बनावट खवा फिकट पांढरा किंवा पिवळसर आणि गंधही नसतो.
 
 
पनीर खोटा आहे की नाही, हे ओळखण्यासाठी कोमट पाण्यात पनीर टाकून त्यात आयोडीन टिंचर घालावे; रंग बदलल्यास पनीर भेसळयुक्त मानावे. तूप खरे आहे की बनावट, हे तपासण्यासाठी चमच्याभर तुपात आयोडीन टिंचर घालल्यास रंग निळा झाला, तर ते बनावट आहे. मिठाई आणि दूधामध्येही अशाच पद्धतीने भेसळ तपासली जाऊ शकते. भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोटदुखी, उलट्या, जुलाब यांसह मूत्रपिंड आणि यकृतास धोका, तसेच आतड्यांमध्ये अल्सर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सणांच्या हंगामात खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
Powered By Sangraha 9.0