‘युगप्रवर्तक-डॉ. हेडगेवार’ नाटक आज

08 Oct 2025 23:39:39
नागपूर, 
‘Yugpravartak-Dr. Hedgewar’ ‘नादब्रह्म संस्था,’ नागपूर निर्मित ‘युगप्रवर्तक-डॉ. हेडगेवार’ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग स्व.डॉ. कमलाकर तोतडे सभागृह, कविकुलगुरू कालिदास विद्यापीठ, रामटेक केलेला आहे. सायंकाळी ६ वाजता होणार्‍या या प्रयोगाला राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल, रामटेकचे भाग संघचालक जयंत मुलमुले, रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रवी भुसारी, तसेच कवी कालीदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अतुल वैद्य, कुलसचिव देवानंद शुक्ल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
 
 
hedagewar
 
‘Yugpravartak-Dr. Hedgewar’  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना शताब्दी वर्षनिमित्ताने नादब्रह्म, नागपूर या संस्थेद्वारे नाटकाची निर्मिती केलेली आहे. डॉ. अजय प्रधान लिखित या नाटकाचे दिग्दर्शन नागपूरचे ज्येष्ठ कलावंत सुबोध सुर्जीकर यांचे असून संगीत सुप्रसिद्व संगीतकार शैलेश दाणी यांचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे कार्य व संघ विचार सांस्कृतिक नाट्य माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा मानस आहे. नाटकाचा प्रयोग नि:शुल्क असून रामटेक व आजुबाजुच्या गावांमधील अधिकाधिक रसिकांनी या नाटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नादब्रह्मचे अध्यक्ष पद्माकर धानोरकर यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0