संभाजीनगर ते दिल्ली नव्याने दोन विमानफेरी सेवा सुरु होणार

09 Oct 2025 20:14:54
बुलडाणा, 
Prataprao Jadhav : पश्चिम विदर्भ , मराठवाडा आणि खान्देशातील ऐतीहासीक, धार्मिक , जागतीकस्तरावरील पयर्टन स्थळांना भेट देणार्‍या नागरिकच्या सेवेसाठी संभाजीनगर विमानतळावरून दिल्लीकरिता आणि दिल्लीवरून संभाजीनगरपर्यंत नव्याने दोन विमान सेवा फेरी सुरु करण्यात आली आहे . केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय विमान वाहतुकमंत्री किंजरापु नायडु यांच्या कडे यां संदर्भाची मागणी केली ती मागणी पुर्ण झाली असून ही विमान सेवा २६ ऑटोबर पासून जनतेच्या सेवेत रजु होत आहे.
 
 
 
BULDHANA
 
 
 
पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याला लागूनच असलेले मराठवाड्यातील संभाजीनगर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रवास सेवेसाठी जवळचे आहे शिवाय बुलढाणा जिल्ह्यामध्ये संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ आहे . लोणार येथे जगविख्यात खार्‍या पाण्याचे लोणार सरोवर आहेत . राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ बुलढाणा जिल्ह्यातील सिदखेडराजा येथे आहे . संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा वेरूळची जगप्रसिद्ध लेणी आहेत या ऐतिहासिक , धार्मिक ,आणि पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येत असतात.
 
 
शिवाय संभाजीनगर , बुलढाणा , जालना ,बीड , जळगाव , धुळे , अहिल्यानगर , येथील व्यापार्‍यांना सुद्धा दिल्ली येथे व्यापारा निमित्त जाण्या येण्यासाठी सध्या, दिल्ली आणि संभाजीनगर दरम्यान दररोज दोन (०२) उड्डाणे (इंडिगो-६ई २३२४ आणि एअर इंडियाची ए१४४३) सेवा सुरू आहे. पूर्वी संध्याकाळी (०६.५० वाजता) एअर इंडिया (दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली) ची अतिरिक्त विमानसेवा बंद करण्यात आली होती . ती सेवा पुन्हा करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री किंजरापु नायडु यांच्या कडे केली होती ही मागणी पूर्ण झाली असून आता पूर्वीच्या दोन आणि नव्याने सुरू झालेली दोन अतिरिक्त विमानसेवा दिल्लीसाठी सुरू होत आहे. 
 
 
ही विमान सेवा २६ ऑटोबर पासून जनतेच्या सेवात रजु होत आहे संभाजीनगर वरून दिल्लीकडे हे विमान सकाळी ८ वा ४० मिनिटांनी आणि दुपारी ४ ः ३० वा जाणार आहे तर दिल्लीवरून संभाजीनगरकडे सकाळी ६ वाजता आणि दुपारी ३ वाजता निघणार आहे या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0