नागपूर,
Center Point School तालुका क्रीडा संकुल, कोराडी येथे जिल्हा क्रीडा कार्यालय, नागपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत सेंटर पॉइंट स्कूल, वर्धमान नगर येथील विद्यार्थिनींनी विभागीय फेरीसाठी स्थान मिळवले आहे.या स्पर्धेत U-17 आणि U-19 मुलींच्या गटात शाळेच्या विद्यार्थिनींनी आपल्या कुशलतेने प्रेक्षक आणि न्यायाधीशांची दाद मिळवली.आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये शाळेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थिनी मंथना काटे – इयत्ता ६,हरिति सेवक – इयत्ता ७,लिआना नाहटा – इयत्ता ७,
रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये मंथना काटे – इयत्ता ६विद्यार्थिनींच्या या यशामागे त्यांचा प्रामाणिक प्रयत्न, सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रशिक्षक पल्लवी खंडागळे यांचे मार्गदर्शन आहे.Center Point School यश मिळाल्यानंतर विद्यार्थिनींनी प्रशिक्षक आणि पालकांना आपले श्रेय दिले. शाळेच्या प्राचार्याकांचन उके, उपप्राचार्या दीपा चक्रवर्ती आणि जयती चक्रवर्ती यांनी विजयी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि विभागीय फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सौजन्य :अंशुल जिचकार,संपर्क मित्र