वाशीम,
animal transport जनावरांची निर्दयीपणे अवैध वाहतूक, वागणूक, प्राणी छळवणूक अधिनियम १९६० अन्वये कार्यवारी करुन जनावरांची वाहतूक करणार्यावर पोलिस प्रशासनाने वचर्क निर्माण केली आहे. याबाबत सविस्तर असे की, ८ ऑटोबर रोजी जनावरांची वाहतूक करणार्याविरुद्ध पोलिस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली.
या अनुषंगाने पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्दसिर खान अतीक खान, रा. आसेगाव ता. मंगरुळनाथ, तैमुर खान रा. आसेगाव ता. मंगरुळनाथ व वाहन क्र. एमएच २० जि. एस. २३९२ बाबत गुप्त माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा वाशीम च्या पथकाने उपरोक्त वाहनाचा पाठलाग करुन सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचेकडून हेले, वगार असे एकूण २७ म्हैस वर्गीय जनावर निदर्यीपणे वाहतूक करतांना वाहनात आढळून आले. सदर वाहन व जनावरे जप्त केले असून, त्याची एकूण किंमत २६ लाख रुपये आहे.animal transport याप्रकरणी उपरोक्त दोन्ही लोकांविरुद्ध मंगरुळनाथ पोस्टे येथे प्राणी छळवणूक अधिनियम १९६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदिप परदेशी, पोउपनि शेखर मास्कर, पोहवा दिपक सोनुने, पोहवा राहुल व्यवहारे, राजकुमार, यादव, भुषण ठाकरे यांनी केली.