गडचिरोलीत होकर्स झोन उभारणीसाठी आ. डॉ. नरोटे यांचा पुढाकार

09 Oct 2025 17:35:12
गडचिरोली,
dr narotes गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णालयाच्या शेजारील परिसरात दीर्घकाळापासून फूटपाथधारकांनी लहान व्यापारी व्यवसाय सुरू केले आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी, अतिक्रमण आणि नागरिकांना होणार्‍या गैरसोयीचा प्रश्‍न गंभीर झाला होता. या पृष्ठभूमीवर नागरिकांच्या तक्रारी व व्यापार्‍यांच्या मागणीनंतर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी या प्रश्‍नाची दखल घेत पुढाकार घेतला आहे.
 
 

dr narote 
 
 
या समस्येवर स्थायी तोडगा निघावा, तसेच फूटपाथ धारकांच्या उपजीविकेचे रक्षण व्हावे या उद्देशाने आमदार डॉ. नरोटे यांनी होकर्स झोन उभारणीचा प्रस्ताव मांडला होता. या संदर्भात त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच महसूल विभागाची योग्य जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना औपचारिक विनंती केली होती. यासंदर्भात आज आमदार डॉ. मिलिंद नरोटे व जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या उपस्थितीत महिला व बाल रुग्णालय शेजारील परिसरातील जागेची पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान संबंधित विभागातील अधिकारी, जनप्रतिनिधी आणि स्थानिक व्यापारी उपस्थित होते. पाहणीअंती डॉ. आमदार नरोटे यांनी सांगितले की, फूटपाथधारक हे आपल्या शहराच्या आर्थिक चक्राचा महत्त्वाचा घटक आहेत. त्यांना योग्य जागा, पायाभूत सुविधा आणि कायदेशीर मान्यता मिळणे आवश्यक आहे. या होकर्स झोनच्या उभारणीमुळे व्यापार्‍यांना स्थैर्य मिळेल आणि नागरिकांनाही सुटसुटीत व सुरक्षित वातावरण लाभेल. लवकरच सदर ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने होकर्स झोन उभारणीचे काम सुरू होणार असून त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया वेगाने सुरु आहे. या माध्यमातून शहरातील फूटपाथधारकांना अधिकृत व सुव्यवस्थित जागा मिळेल.dr narotes तसेच वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक स्वच्छतेवरही नियंत्रण येईल. आमदार डॉ. नरोटे यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक लघु व्यवसायांना चालना देऊन स्थानिक रोजगार निर्मिती, नागरिक सोयीसाठी शहरी नियोजन आणि सुव्यवस्थित शहर विकास साध्य होईल असा विश्‍वास व्यक्त केला.
या पाहणीदरम्यान भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, तहसीलदार शुभम पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नीता ठाकरे, रुपाली काळे तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0