आरक्षण जाहीर होताच समाज माध्यमांवर स्वयंघोषित उमेदवारांचा उच्छाद

09 Oct 2025 19:03:33
गोंदिया,
Gondia municipal election दीर्घ प्रतीक्षेनंतर नगर पालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. प्रभाग रचाना व नगराध्यक्ष, नगरसेवकांचे आरक्षण जाहीर झाले आहे. इच्छुकांनी स्वतःला समाज माध्यमांवर नगराध्यक्ष, नगरसेवक पदाचे उमेदवार घोषित करून प्रचारही सुरू केल्याचे चित्र विविध समाजमाध्यमांवर पहायला मिळत आहे.
 

Gondia municipal election 
येथील नगर पालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ मध्ये संपुष्टात आला. सध्या नगर पालिकेवर प्रशासक राज सुरू आहे. दीर्घ कालावधीनंतर निवडणूक होणार आहे. घुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या भावी उमेदवारांमध्ये चैतन्य संचारले आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने ६ ऑक्टोबर रोजी नगराध्यक्ष तर ८ रोजी स्थानिक नगरपालिका प्रशासनाने नगरसेवक पदाचे आरक्षण काढले. नगराध्यक्षाची थेट मतदारातून निवड होणार आहे.
हे पद नागरिकांचा Gondia municipal election मागस प्रवर्ग (सर्वसाधारण) साठी आरक्षित झाले आहे. यामुळे येत्या पालिका निवडणुकीत या प्रवर्गातील उमेदवारांमध्ये चांगलीच चूरस पहायला मिळणार आहे. तर महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांना जागा वाटप करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. आता आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांच्या बैठका, मेळाव्यांनी जोर धरला आहे. कालचे मित्र आजचे शत्रू तर कट्टर वैरी मित्र झाल्याने निकालाचे समिकरणही बदलणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमिवर होणारी ही निवडणूक रंगतदार होणार आहे. गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही जागा महायुतीने जिंकत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. मात्र नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महायुती नेत्यांना सातत्य ठेवताना कसरत करावी लाणार आहे. सध्या सामाजिक माध्यमांवर राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वतःला नगराध्यक्ष, नगरसेवक पदाचे उमेदवार घोषीत करून प्रचारही सुरू केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. असे असले तरी या निवडणुकीत युती, आघाडी होईल की नाही हेही पाहणे औत्सुकाचे ठरेल.
Powered By Sangraha 9.0