बहावलपूर नान, बालाकोट तिरामिसू ते सरगोधा दाल मखानी!

09 Oct 2025 13:33:54
नवी दिल्ली,
Indian Air Force dinner menu भारतीय हवाई दलाचा 93 वा वर्धापन दिन 8 ऑक्टोबर रोजी भव्यपणे साजरा झाला, परंतु या उत्सवातील डिनर पार्टीचा मेन्यू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. कारण, मेन्यूतील पदार्थांची नावे साध्या जेवणासाठी नव्हती, तर पाकिस्तानातील विविध ठिकाणांच्या नावांशी जोडली गेली होती. मसाला, रफीकी रारा मटन, भोलारी पनीर मेथी मलाई, सुक्कूर शाम सवेरा कोफ्ता, सरगोधा दाल मखानी, जेकोबाबाद मेवा पुलाव आणि बहावलपूर नान यांचा समावेश होता. तसेच मिठाईंमध्ये बालाकोट तिरामिसू, मुझफ्फराबाद कुल्फी फालुदा आणि मुरीदके मिठा पान यांचा समावेश होता.
 

Indian Air Force dinner menu
 
या सर्व नावे भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लष्करी कारवायांशी संबंधित आहेत. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्याच्या प्रत्युत्तरात केलेल्या बालाकोट हवाई हल्ला आणि 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूर या कारवाया यातील प्रमुख आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य केले, ज्यामध्ये मुरीदके आणि बहावलपूर या ठिकाणांचा समावेश होता, जे लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय म्हणून ओळखले जातात.
 
 
गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर झालेल्या हवाई दल दिन परेडमध्ये भारतीय हवाई दलाने आपले सामर्थ्य पुन्हा दाखवले. राफेल, सुखोई-30 एमकेआय, मिग-29, सी-17 ग्लोबमास्टर III, सी-130जे हरक्यूलिस विमान आणि अपाचे हेलिकॉप्टर आकाशातून गर्जना करत प्रेक्षकांना रोमांचित करत होते. हा उत्सव फक्त लष्करी सामर्थ्य दाखवण्यासाठीच नव्हता, तर देशभक्ती आणि राष्ट्रीय सुरक्षा याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठीही होता. या मेन्यूने सोशल मीडियावर खूपच उत्सुकता निर्माण केली असून, नागरिकांनी हसतमुख प्रतिक्रियाही दिल्या आहेत. विशेष म्हणजे, हा मेन्यू भारताच्या दहशतवादविरोधी कारवायांशी जोडलेला असल्यामुळे, सैनिकांच्या योगदानाची आठवणही करून देतो.
Powered By Sangraha 9.0