अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून

09 Oct 2025 20:29:20
तभा वृत्तसेवा
पुसद,
Murder due to immoral relationship : अनैतिक संबंधात अडसर ठरणाèया पतीचा खून करणाèया पत्नी व प्रियकरास जन्मठेपेची शिक्षा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शरणजितसिंह रामगडिया यांनी ठोठावली. पत्नी व प्रियकराने त्याच्याच घरात पतीचा ओढणीचे सहायाने गळा आवळून खून करून प्रियकरास घटनास्थळावरून पसार केले तर पत्नी घटनास्थळी रडत बसली. परंतु अनैतिक प्रेम प्रकरणाची माहिती मृतकाच्या भावाला माहीत असल्याने त्याच्या तकारीवरून मृतकाची पत्नी व प्रियकरावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले.
 
 
 
MURDER
 
 
 
न्यायालयात सहायक सरकारी वकील अ‍ॅड. रवी रुपुरकर यांनी 11 साक्षी तपासल्या. मृतकाची पत्नी व तिच्या प्रियकराने संगणमताने खून केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे या दोघांनाही कलम 302 नुसार जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंड किंवा एक वर्षाची शिक्षा असा निकाल न्या. शरणजितसिंह रामगडिया यांनी जाहीर केला. थोडक्यात हकीकत अशी की, यातील मयत सतपालसिंग उर्फ बबलू सूरजसिंग यादव व त्याचा भाऊ विजयपाल हे हरियाणा येथील असून ते कामानिमित्त पुसद येथे अंदाजे 25 वर्षांपासून आले होते. सतपालसिंहचा विवाह येथील सुमन उर्फ बाली हिच्यासोबत झाला होता. त्या संबधातून त्यांना एक मुलगा व एक मुलगीसुद्धा झाले होते.
 
 
17 जून 2017 रोजी सकाळी सतपालसिंग हा त्याच्या घरात मृतावस्थेत असल्याची माहिती त्याचा भाऊ विजयपाल याला कळताच त्याने सतपालची पत्नी सुमनला विचारले. पण तिने काहीही माहिती दिली नाही. त्याने वसंतनगर पोलिसांना सुमन व तिचा प्रियकर शैलेंद्र खिल्लारे यांच्यात अडसर ठरणारा असल्याने सतपालचा या दोघांनी मिळून गळा आवळून ठार मारले असल्याची तक्रार केली.
सहायक पोलिस निरीक्षक ब्रिजपालसिंग ठाकूर यांनी तपास करून आरोपी शैलेंंद्र व सुमन यांचे सहा महिन्यांपासून प्रेमसंबध होते. त्यांच्या प्रेमसंबधात अडथळा होत असल्याने पत्नी व प्रियकराने कट रचून त्याचा खून केला. या प्रकरणात वसंतनगर पोलिस ठाण्यातील अश्फाक नौरंगाबादी यांनी पैरवी म्हणून काम पाहिले.
Powered By Sangraha 9.0