नागपूर कारागृहातील कैद्याकडे सापडला गांजा

09 Oct 2025 17:33:12
अनिल कांबळे


नागपूर,
nagpur central jail मध्यवर्ती कारागृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बंदिस्त असलेल्या कैद्याकडून प्रवेशद्वाराजवळ घेतलेल्या झडतीमध्ये गांजा आढळून आला. या घटनेमुले मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यशवंत बाळू शिंदे (वय 38) असे गांजा सापडलेल्या कैद्याचे नाव आहे. या प्रकरणी धंताेली पाेलिसांनी गुनहा दाखल केला असून दाेन पांढèया रंगाच्या प्लास्टिक पुड्यामध्ये सेलाेटेप गुंडाळलेल्या अवस्थेत दाेन पाकिटांमध्ये 40 ग्रॅम गांजा सदृश्य पाेलिसांनी जप्त केला.
 
 

nagpur central jail 
नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ धंताेली पाेलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या डाव्या हातातल्या रुमालात प्लास्टिक पिशवीत बांधून ठेवलेल्या दाेन पुड्या सापडल्या. पंचासमक्ष पाेलिसांनी त्याची तपासणी केली असता ताे गांजा असल्याचे स्पष्ट झाले. रायगड जिल्ह्यातल्या पाेलादपूर तालुक्यातील वकान तालुक्यातल्या खांबेश्वरी वाडी येथील रहिवासी यशवंत बाळू शिंदे हा अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात शिक्षा भाेगत आहे. वैद्यकीय कारणास्तव त्याला साेमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले हाेते. तेथून परतल्यानंतर यशवंत शिंदेच्या डाव्या हातातील रुमालात प्लास्टिकच्या दाेन पुड्या सापडल्या. याची लगेच धंताेली पाेलिसांना माहिती देण्यात आली. पाेलीस शिपाई सचिन कुंडलिकराव इंगळकर यांच्या तक्रारीवरून धंताेली पाेलिसांनी पंचनामा करत गुन्हा दाखल केला.
Powered By Sangraha 9.0