सायबर युगातील लोकशाहीवर मार्गदर्शन

09 Oct 2025 19:14:20
नागपूर,
Ramakrishna Wagh College छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, हिंगणघाट येथे सामाजिक शास्त्र विभागाच्या वतीने “आधुनिक लोकशाही आणि सायबर राजकारण” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका लता वाघ होत्या. प्रमुख वक्ते म्हणून अध्यक्ष, राज्यशास्त्र अभ्यास मंडळ, रा.तु.म. विद्यापीठाचे डॉ. प्रवीण भागडीकर यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे, सर्व शाखांचे विभागप्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती
पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

58 
 
 डॉ. भागडीकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात सांगितले की, “डिजिटल युगात सायबर माध्यमांमुळे लोकशाही अधिक पारदर्शक व लोकाभिमुख बनली आहे. नागरिकांचा सहभाग सोशल मीडियाद्वारे अधिक प्रमाणात दिसून येतो. मात्र, सायबर सुरक्षेचे भान ठेवणे हे तितकेच महत्त्वाचे आहे.Ramakrishna Wagh College ”रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना कहाळे पत्की यांनी सांगितले की, “लोकशाहीची खरी ताकद जनसहभागात असते, आणि सायबर माध्यमे त्या सहभागाला एक नवाआयाम देतात असे मत प्रतिपादन केले. लता वाघ यांनी आपल्या वक्तव्यातून सायबर जबाबदारी नाही लोकशाहीची मूल्य जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक सचिव मारोती वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय पाठक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभांगी वाघ यांनी केले. आभार प्रा. पदमा वाळके यांनी मानले.
सौजन्य:सायली लाखे /पिदळी,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0