वंजारी महाविद्यालयात “ऑरा” फोरम इन्स्टॉलेशन कार्यक्रम

09 Oct 2025 16:41:18
नागपूर,
Vanjari College of Engineering गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाने २०२५-२०२६ शैक्षणिक वर्षासाठी बी.टेक. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “ऑरा” फोरम इन्स्टॉलेशन कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, जबाबदारी आणि सक्रिय सहभागाची भावना निर्माण करणे होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि इतर उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी त्यांचा सक्रिय सहभाग नोंदवला.

236j 
 
 
या कार्यक्रमाचे आयोजन अमर सेवा मंडळाचे सचिव आणि आमदार ॲड. अभिजित वंजारी, तसेच कोषाध्यक्षा डॉ. स्मिता वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.Vanjari College of Engineering महाविद्यालयातील मान्यवरांचे आणि नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासात उत्कृष्टतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा दिली, तर डीन अकॅडेमिक्स डॉ. राकेश श्रीवास्तव यांनी शैक्षणिक नियोजन आणि भविष्यातील यशाबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमामध्ये पारंपारिक नृत्य सादरीकरण, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचा प्रगट केला, तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश होता. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक आणि पाहुण्यांचा मोठा सहभाग होता.
सौजन्य:मनोज वैराळकर,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0