वाशीम जिल्ह्यातील सहा पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर

09 Oct 2025 18:42:43
वाशीम,
Washim Panchayat Samiti वाशीम जिल्ह्याच्या अधिकार क्षेत्रातील सहा पंचायत समित्यांचे सभापती पदाचे आरक्षण अडीच वर्षांच्या कालावधीकरिता निश्चित करण्यात आले. त्यामध्ये अनुसूचित जाती महिला राखीव १, नागरिकांचा मागास प्रवर्ग १, महिला राखीव १, सर्व साधारण २, महिला राखीव १ आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत ९ ऑटोबर रोजी दुपारी ३ वाजता, नियोजन भवन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम येथे विशेष सभा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव उपस्थित होते.
 

Washim Panchayat Samiti 
पंचायत समिती सभापती आरक्षण संदर्भात आरक्षणाचा पहिला प्रकार अनुसूचित जाती (महिला) या पदाचे आरक्षण यामध्ये सर्वात पुर्वी अनुसूचित जाती आरक्षण निघालेली पंचायत समिती मानोरा आहे. पंचायत समिती सभापती आरक्षण संदर्भात आरक्षणाचा दुसरा प्रकार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या पदाचे आरक्षण ग्रामविकास विभाग यांची अधिसूचना ९ सप्टेंबर २०२५ अन्वये निश्चित करून देण्यात आलेल्या आरक्षणापैकी नामाप्र (सर्वसाधारण) १ जागा, नामाप्र (महिला) १ जागा, यापूर्वी पंचायत समिती वाशीम, मानोरा, मालेगाव यामध्ये नामाप्र आरक्षण असून त्यापैकी मानोरा (अ.जा महिला) निश्चित झालेली आहे. त्याआधी २०१६ ते २०१८ मध्ये रिसोड व कारंजा नामाप्र साठी राखीव होते. कारंजा नामाप्र आरक्षण २००८ - २०११ मध्ये होते. रिसोड नामाप्र आरक्षण २००६-२००८ मध्ये होते. म्हणून कारंजा व रिसोड पैकी रिसोड मध्ये नामाप्र आरक्षण निश्चित होते. दुसरे नामाप्र आरक्षण मंगरूळनाथ मध्ये निश्चित झाले.
नामाप्र आरक्षण मंगरूळनाथ व रिसोड यामध्ये यापूर्वीचे नामाप्र महिला आरक्षण विचारात घेतले असता मंगरूळनाथ नामाप्र महिला २००८ ते २०११ आणि रिसोड नामाप्र महिला २००६ ते २००८ अशी आहे.त्यामुळे रिसोड नामाप्र महिला आरक्षण निश्चित होते. मंगरूळनाथ नामाप्र सर्वसाधारण निश्चित झाले. प्रवर्ग सर्वसाधारण एकुण ३ जागा त्यापैकी सर्वसाधारण महिला १, सर्वसाधारण २ उर्वरित पंचायत समिती वाशीम, मालेगाव, कारंजा यापैकी मालेगाव सर्वसाधारण महिला आरक्षण २०२२ ते २०२५ , कारंजा सर्वसाधारण महिला आरक्षण २०२० ते २०२२ आणि वाशीम सर्वसाधारण महिला आरक्षण २००६ ते २००८ असे आहे.त्यामुळे सर्वसाधारण महिला आरक्षण वाशीम पंचायत समिती सर्वसाधारण (महिला), मालेगाव सर्वसाधारण आणि कारंजा सर्वसाधारण निश्चित करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीला नागरिक, पत्रकार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0