तभा वृत्तसेवा झरी,
Zhari road येथील वीर बिरसा मुंडा चौकापासून ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत जिल्हा परिषद बांधकाम विभाग या अंतर्गत येत असलेल्या डांबर रोडचे काही महिन्यांपूर्वी झाले असून त्या डांबर रोड निकृष्ठ दर्जाचे झाले असून त्या रस्त्यावर खडे पडल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिप बांधकाम अभियंत्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या रस्त्यावर खड्डे पडले असल्याचे बोलल्या जात आहे.
झरी येथील हा महत्त्वाचा रस्ता असून या मार्गावर ग्रामीण रुग्णालय जामनी दुर्गापूर न्यायालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरोला-मांगुर्ला जाण्याचा रस्ता असून या मार्गाने अनेक वाहने व शाळेचे अनेक विद्यार्थी ये-जा करतात. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ राहत असते या नव्याने झालेल्या डांबर रोडवर खड्डे पडल्याने वाहन चालवायचे कसे असा प्रश्न वाहनधारकांना व नगरवासींना पडला आहे. हे खड्डे बुजवण्याकरिता संबंधित ठेकेदाराने चुरी आणून टाकली आहे. परंतु त्यापैकी कोणतेही काम केल्याचे दिसत नाही. रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून संबंधित अभियंत्यांनी या कामाची चौकशी करावी व पडलेल्या खड्ड्यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनधारक व नगरवासींकडून होत आहे.