अकोला,
Akola scam worth 11.50 lakhs जननी सुरक्षा योजनेत अकरा लाख पन्नास हजार रुपयांचा घोळ झाल्याच्या तक्रारी वरून आरोग्य उपसंचालक यांनी गठीत केलेल्या चौकशी समिती समोर आरोप असलेल्या जीएमसीच्या स्त्री रोग तज्ञ डॉ.अपर्णा वाहने या दुसऱऱ्यांदा गैरहजर राहल्या आहेत.त्यामुळे या प्रकरणात संशयाची सुई आणखी वाढत आहे दरम्यान या प्रकरणात आणखी आरोप असणारे तत्कालीन अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक व संबंधित लिपिक याचे बयाण समितीने नोंदविले आहे.

अकोल्यातील तक्रारदार गणेश कुरई यांनी केलेल्या तक्रारीनुसार, जीएमसीच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. अपर्णा वाहणे यांनी जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ११ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केला असून या प्रकरणात इतर अधिकारी व कर्मचारीही सहभागी असल्याचा आरोप आहे. निधीच्या अपहारप्रकरणी स्थापन केलेल्या चौकशी समितीने शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चौकशी केली. या वेळी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजबिये, संबंधित लिपिक विजय बोरसे, मिलिंद हिवराळे आणि अधिष्ठाता डॉ.संजय सोनुने यांचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान डॉ.अपर्णा वाहणे वगळता सर्व संबंधित अधिकारी चौकशी समिती आली असता उपस्थित होते.
चौकशी समितीत यांचा समावेश
या प्रकरणाचे विस्तृत चौकशी करण्यासाठी आरोग्य उपसंचालक डॉ वाकचौरे यांनी चौकशी समिती गठीत केली असून त्यानुसार चौकशी समितीचे नेतृत्व अमरावती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड, समिती सदस्य डॉ. संदीप हेडाऊ, अशोक कोठारी आणि सुदाम भिंगारे करीत आहे.
काय आहे प्रकरण?
जननी सुरक्षा योजना ही गरीब गरोदर महिलांमध्ये संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देऊन माता आणि नवजात मृत्यूदर कमी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येते.या योजनेत जीएमसीच्या अधिकाऱ्यांना अपहार केल्याची तक्रार अकोल्याच्या एका युवकाने केली आहे. त्यानंतर चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे