अकोला,
Developed India expands agricultural 'विदर्भाच्या भूमीत कृषी विद्यापीठ स्थापन स्थापन करण्यामागील भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा दृष्टिकोन आज सफल होताना दिसत असून गत 56 वर्षांमध्ये अकोला कृषि विद्यापीठाने कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यात संपादन केलेले भरीव यश वं त्यामुळे वैदर्भीय शेतकऱ्यांच्या जीवनमानात अमुलाग्र बदल घडवून आणण्याचे भाऊसाहेबांचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकारताना दिसत असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान संस्थेचे उपमहासंचालक (पीक विज्ञान) डॉ. देवेंद्र यादव यांनी केले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या 57 व्या स्थापना दिनानिमित्त उद्घाटक म्हणून उपस्थितांना संबोधितांना ते बोलत होते.
देशांतर्गत वाढती लोकसंख्या विचारात घेता कृषीप्रधान ग्रामीण संस्कृती लाभलेल्या आपल्या देशाचा विकसित व आत्मनिर्भर होण्याचा मार्ग कृषि क्षेत्रातूनच अधिक विस्तारत असल्याचे सांगताना डॉ. यादव यांनी व्यावसायिक शेती व्यवसायाचा मुलमंत्र आपल्या अतिशय शैलीदार आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून उपस्थित कृषि पदवीधरांच्या गळी उतरवीतांना या विद्यापीठातून उत्कृष्ट युवा वैज्ञानिक घडावेत असा आशावाद देखील व्यक्त केला. तर अकोला कृषी विद्यापीठाचा प्रत्येक विभाग स्वयंपूर्णतेसह आत्मनिर्भर्तेकडे कसे जायचे ते शिकण्यासारखे असल्याचे प्रतिपादित करीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीवकुमार सोनवणे यांनी कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करताना अकोला विद्यापीठाचे शेतकरी व्यक्तिमत्व विकासा साठीचे कार्य निश्चितच अनुकरणीय असल्याचे देखील आपल्या मार्गदर्शनात सांगितले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना विधान परिषदेचे सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार अमोल मिटकरी, आमदार किरण सरनाईक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने झाली. यावेळी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीला उपस्थितांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले.