मैथीली पालिवालचे फेक फेसबूक अकाऊंट; रोहन हिवाळे याला अटक

01 Nov 2025 21:17:17
आर्वी,
rohan-hiwale : समाजात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करून महापुरुषांचा आणि देव-देवतांचा अवमान करणार्‍या ‘मैथिली पालीवाल’ या वादग्रस्त फेक फेसबुक अकाऊंट प्रकरणी रोहन हिवाळे याला पोलिसांनी आज १ रोजी अटक केलीे.
 
 

K  
 
‘मैथिली पालीवाल’ या खोट्या नावाने चालवल्या जाणार्‍या अकाऊंटवरून गेल्या वर्षभरापासून छत्रपती शिवाजी महाराज, गजानन महाराज, भिकाजी महाराज यांच्यासह अनेक महान व्यक्तिमत्त्वे आणि धार्मिक भावना दुखावणार्‍या पोस्ट शेअर केल्या जात होत्या. यामुळे समाजात तणाव निर्माण झाला होता. एका विशिष्ट समाजाच्या महिलेच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून समाजात विषारी विचार पसरवण्याचा प्रयत्न, समाजात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार अत्यंत लज्जास्पद आहे. त्यामुळे आर्वीकर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यत केली होती. या प्रकरणाचा दोन दिवसांपूर्वी भंडाफोड झाल्यानंतर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सामाज माध्यमांवर द्वेषपूर्ण आणि भडकाऊ पोस्ट करून विविध समाजघटकांमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आर्वी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीचा शोध घेतला व त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास आर्वी पोलिस करत आहेत.
 
 
काही दिवसांपूर्वी फेसबुकवर मैथिली पालीवाल नावाने एक फेक अकाउंट तयार करण्यात आलं होतं. त्या फेक अकाउंट वरून हिंदू देवी देवता व महापुरुषावर अतिशय घाणेरड्या आणि गलिच्छ शब्दात टीका करून हिंदू समाजाचा अपमान केला गेला होता. याप्रकरणी जवाबदार असलेल्या इसमा विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजयुमो आर्वी शहर अध्यक्ष स्वप्नील कठाळे आर्वी शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती.
Powered By Sangraha 9.0