अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात इसमाचा मृत्यू

01 Nov 2025 17:12:31
मालेगाव,
malegao news राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर मालेगाव-वाशीम दरम्यान झोडगा गावाजवळील जलधारा हॉटेलसमोर ३० ऑटोबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडलेल्या अपघातात एका अज्ञात पादचारी इसमाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पादचारी इसम रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.
 

accident 
 
धडकेनंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही.malegao news तो रंगाने सावळा, मजबूत बांध्याचा असून वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे दरम्यान आहे. त्याने अंगात पांढर्‍या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. पोलिसांनी नागरिकांना या इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, अज्ञात वाहन व त्याच्या चालकाचा शोध सुरू असून, पुढील तपास ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रशांत वानखेडे करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0