28 वर्षांनी लहान मोलकरणीशी लग्न आणि...

01 Nov 2025 11:40:20
लंडन,
Marriage to a little maid ब्रिटनमध्ये एका श्रीमंत उद्योगपतीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीवरून सुरू झालेला कौटुंबिक वाद चांगलाच गाजतो आहे. “कार बूट किंग” म्हणून प्रसिद्ध असलेले व्यावसायिक रिचर्ड स्कॉट यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर घरातील मोलकरणीशी लग्न केलं आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबात खळबळ उडाली. रिचर्ड स्कॉट हे ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कार बूट फेअर चालवणारे उद्योजक होते. 2016 मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी जेनिफर नावाच्या आपल्या घरातील क्लिनरशी लग्न केले. जेनिफर वयाने त्यांच्यापेक्षा तब्बल 28 वर्षांनी लहान होती. या लग्नानंतर स्कॉट यांनी आपला मोठा मुलगा अॅडम स्कॉटला मृत्युपत्रातून वगळले.
 
Marriage to a little maid
रिचर्ड यांच्या निधनानंतर त्यांच्या संपूर्ण इस्टेटचा वारसा, जवळपास 43 दशलक्ष पाऊंड किमतीची मालमत्ता, जेनिफर आणि तिच्या मुलांना देण्यात आला. यानंतर अॅडमने न्यायालयात धाव घेतली आणि आपल्या वडिलांनी मृत्युपत्र तयार करताना ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते, असा दावा केला. अॅडमच्या मते, त्यांचे वडील डिमेंशियाने ग्रस्त होते आणि जेनिफरने त्यांच्यावर दबाव टाकून मृत्युपत्र बदलण्यास भाग पाडले.
अॅडमने न्यायालयात सांगितले की तो मागील 40 वर्षांपासून आपल्या वडिलांसोबत शेतीचे काम सांभाळत होता आणि त्यामुळे त्याला फार्मचा वारसा मिळेल, अशी त्याची अपेक्षा होती. त्याने सांगितले की त्याने आपल्या आयुष्याची अनेक दशके वडिलांच्या व्यवसायात घालवली, मात्र अखेरीस त्याच्यावर अन्याय झाला. दुसरीकडे, जेनिफरच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की रिचर्ड पूर्ण शुद्धीवर होते आणि त्यांनी अॅडमला मृत्युपत्रातून काढून टाकले कारण त्यांच्यातील नटे तुटलं होते. त्यांनी हेही नमूद केलं की अॅडमला आधीच सुमारे 10 दशलक्ष पाऊंड किमतीची मालमत्ता आणि जमीन वारशाने मिळाली होती. त्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या वंचित राहिलेला नाही. सध्या या प्रकरणावर ब्रिटनच्या कौटुंबिक न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणामुळे उच्चवर्गीय समाजात आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, ‘प्रेम, संपत्ती आणि विश्वासघात’ या तिन्हींचं मिश्रण असलेला हा वाद यूकेतील सर्वात चर्चित कौटुंबिक खटल्यांपैकी एक ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0