सेव्हन नोट्सच्या स्वरांनी रंगली सुरेल शाम

01 Nov 2025 14:48:16
नागपूर,
Scientific Auditorium ‘सेव्हन नोट्स’ आयोजित ‘सुरमयी यादों की शाम’ या संगीत मैफलीत गायक कलाकारांच्या बहारदार सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रम सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे पार पडला. ‘झुकी झुकी सी नजर’, ‘होठों से छु लो तुम’, ‘दिल चीज है क्या’ यांसह तब्बल २७ सुमधुर गीतांनी श्रोत्यांना गतस्मृतींच्या लहरींवर झुलवले.
 
Scientific Auditorium
 
गायक मुकुल पांडे, पद्मजा सिन्हा, डॉ. सुधीर कुन्नावार, सुचिता पद्मावार आदींना आर्य पुराणकर व सचिन ढोमणे यांचे संगीत संयोजन लाभले. Scientific Auditorium वैभव पारसकर यांच्या निवेदनाने कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
सौजन्य: वर्षा किडे कुळकर्णी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0