गँगवॉरचा थरकाप ! गणेश काळेची गोळ्या घालून हत्या

01 Nov 2025 18:01:48
पुणे,
Ganesh Kale murder शहरात पुन्हा एकदा गँगवॉरचा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे. कोंढवा परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या गोळीबारात गणेश काळे (वय अंदाजे ३०) या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार आंदेकर टोळीतील चार संशयितांनी हा हल्ला केला असून, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Ganesh Kale murder  
कोंढव्यातील मुख्य रस्त्यालगत गणेश काळे हा आपल्या रिक्षामध्ये बसलेला असताना चार जणांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात सहा ते सात गोळ्या झाडण्यात आल्याचे साक्षीदारांनी सांगितले. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्यानेही वार केले. गंभीर जखमी अवस्थेत गणेश काळे जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे जमा केले. पोलिसांनी परिसर सील करून सामान्य नागरिकांच्या हालचालींवर तात्पुरता प्रतिबंध घातला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
 
 
गणेश काळे हा Ganesh Kale murder  गायकवाड टोळीतील समीर काळेचा भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. समीर काळे सध्या वनराज आंदेकर हत्या प्रकरणात शस्त्र पुरवल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. या पार्श्वभूमीवर गणेश काळेची हत्या ही आंदेकर टोळीने बदला म्हणून केल्याची शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे.वनराज आंदेकर प्रकरणामुळे दोन्ही टोळ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वैराचे वातावरण होते. त्यामुळे या खुनाचा थेट संबंध त्या प्रकरणाशी जोडला जात असल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे.कोंढव्यात झालेल्या या रक्तरंजित घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस या प्रकरणातील संशयितांचा शोध घेत असून, शहरातील टोळ्यांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे.या हत्याकांडामुळे पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोंढव्यातील हा खून केवळ वैयक्तिक वैरातून नव्हे तर टोळी संघर्षातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील चौकशीत या हत्येचा नेमका हेतू आणि हल्लेखोरांची ओळख स्पष्ट होणार आहे.
Powered By Sangraha 9.0