तभा वृत्तसेवा
बाभुळगाव,
Babhalgaon police भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 159 व्या जयंतीनिमित्त बाभुळगाव येथे एकता अखंडता संकल्प जनजागृतीचे आयोजन येथील बसस्थानकावर दौड आयोजित करून करण्यात आले. यात पोलिस निरीक्षक तावरे, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत चौधरी, पोलिस उपनिरीक्षक धर्मासिंग उईके, प्रेस क्लबचे अध्यक्ष आरिफ अली, प्रवीण लांजेकर, कल्पक वाईकर, अनिकेत पोहकार, चुडामन मदारे, दिलीप वाघमारे, नरेंद्र बोबडे, सुनील एंडे, सुभाष काशेट्टीवार, मयूर शर्मा, निखिल तातेड, दीपक आसकर, अर्णव अहिरे, सर्व पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, प्रताप विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी सहभागी झाले होते.
यवतमाळ जिल्हा पोलीस दल पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 व्या जयंतीनिमित्त, ‘रन फॉर युनिटी, दारव्हा पोलिस स्टेशनच्या वतीने शुक्रवार, 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.30 वाजता मुंगसाजी महाराज महाविद्यालय ’एकता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे. या दौडमध्ये दारव्हा पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी, नगर परिषद चे मुख्य अधिकारी तथा कर्मचारी, होमगार्ड चे तालुका समदेशक, होमगार्ड सैनिक व युवक, युवती, खेळाडू, शहरातील नागरिक, विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले .या दौडमध्ये दारव्हा शहरातील विविध सामाजिक संघटना, क्रीडा क्षेत्रातील क्रीडाप्रेमी खेळाडू, तरुण मित्रमंडळी आणि विद्यार्थी- विद्यार्थनिींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला या मध्ये, डॉ. सिद्धेश्वर भोरे, एसडीपीओ विठ्ठल केदारे, मुख्याधिकारी नगर परिषद दारव्हा, नायब तहसीलदार प्रकाश खाटिक, एपीआय दिनेश गावंडे, तारक, जांभेकर, कोरपे, प्रा. सुरेश निमकर, प्रा. भैरव भेंडे, चैतन्य ऑफ स्पोर्ट ग्रुपचे अध्यक्ष गणेश भोयर, प्रा. चकवे, मुकेश चुडे महाराज, अजिंक्य अकॅडमी, संकल्प मंडळ, बोबडे. अमोल सारोक, होमगार्ड तालुका समादेशक अधिकारी खान, वसंता लोंढे, प्रवीण खाडे, माजी सैनिक शरद सावळे, अमोल राजपल्लू, विजय काळे, अमित गुल्हाने, खिलेश घेरवरा, श्याम पांडे, सोमेश कडव, चंदू कनोजिया, आप्पाजी लाभसेटवार, रमेश गुडधे, सूत्रसेन भितकर, होमगार्ड सैनिक शिक्षक, विविध सामाजिक संघटनेचे व चैतन्य ग्रुपचे खेळाडू तथा मोठ्या संख्येने रनर उपस्थित होते.
यासाठी दारव्हा पोलिस अधिकारी व कर्मचाèयांनी परिश्रम घेतले. आभारप्रदर्शन चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्टसचे फूटबॉल मार्गदर्शक गणेश भोयर यांनी केले.