25 वर्षांनी पुन्हा ‘शाळा’ भरली जुन्या आठवणींना उजाळा

01 Nov 2025 16:04:22
तभा वृत्तसेवा पाटणबोरी,
Patanbore alumni meet केळापुर तालुक्यातील पाटणबोरी येथे 26 ऑक्टोबरला श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या बाकावरची ती निरागस मैत्री, शिक्षकांचा धाक आणि वर्गातील ती मजा. या सगळ्या आठवणींना उजाळा देण्यासाठी श्री शिवछत्रपती विद्यालय पाटणबोरीच्या वर्ष 1995-2000 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन तब्बल 25 वर्षांनी शाळेच्या बच्छराज व्यास सभागृहात मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडले.
 

Patanbore alumni meet 
या स्नेह मेळाव्यात 25 वर्षांपूर्वी शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर, व्यावसायिक, अधिकारी अशा विविध क्षेत्रांत यशस्वी झालेले दिसत होते. एकमेकांना पाहताच त्यांच्या चेहèयावर आनंद आणि आश्चर्याचे भाव उमटले. सुरुवातीला औपचारिक ओळख झाल्यानंतर, ‘आपण इतके मोठे झालो’ हे विसरून सगळेजण पुन्हा एकदा शाळेतील ‘बच्चा कंपनी’ झाले होते. एकमेकांची गळाभेट घेत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
 
 
या कार्यक्रमाचे Patanbore alumni meet खास वैशिष्ट्य शिव छत्रपती विद्यालयाचे सचिव विष्णू पोंक्षे उपस्थित होते. आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक शेंद्रे. कर्मचारी वृंद वसंत शिंगेवार, शंकर पत्रावळे, संतोष बोळकुंटवार उपस्थित होते. तत्कालीन कर्मचारी तसेच उपस्थित सर्व गुरुजनांचा केलेला यथोचित सत्कार. विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्यात शिक्षकांचे योगदान अमूल्य होते, अशी कृतज्ञता यावेळी अनेकांनी व्यक्त केली. शिक्षकांनीही आपल्या माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या.मेळाव्यात शाळेतील गमतीजमती, एकत्र केलेला अभ्यास, क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन आणि शिक्षकांनी दिलेल्या शिक्षा अशा अनेक विषयांवर गप्पांच्या फैरी रंगल्या. काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या दिवसांवर आधारित छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ज्यामुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले.
 
 
यावेळी बोलताना Patanbore alumni meet अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या यशस्वी जीवनामागे शाळेतील संस्कारांचा आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. या मेळाव्याच्या निमित्ताने ‘माजी विद्यार्थी संघटना’ स्थापन करण्याचा आणि शाळेच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याचा संकल्पही यावेळी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सुंदर नियोजन अजय मुंजेकर यांनी केले स्नेहभोजनानंतर हा भावनिक आणि अविस्मरणीय सोहळा पुढील वर्षाच्या भेटीच्या आश्वासनासह झाला. यासाठी अमोल भागानगरकर, नितीन येरोजवार, संगीता नालमवार, प्रमोद तोटावार, भोजन्ना पोतगंटीवार, प्रशात मुमडवार यांनी परिश्रम घेतले. आभारप्रदर्शन अमृत गंड्रतवार यांनी केले. हा भावनिक आणि अविस्मरणीय सोहळ्याचा पुढील वर्षाच्या भेटीच्या आश्वासनासह समारोप झाला.
Powered By Sangraha 9.0