नवी दिल्ली,
Slim's ancestors were Hindus सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे, ज्यामध्ये झहेक तन्वीर नावाच्या एका मुस्लिम युवकाने एक धाडसी विधान केले आहे. या व्हिडिओमध्ये तन्वीर म्हणतो की, भारतातील मुस्लिमांचे पूर्वज हे मूळतः हिंदूच होते. या विधानामुळे त्याच्या समुदायातील काही लोक संतप्त झाले असून त्याच्यावर कारवाईची मागणीही होत आहे.

तन्वीरने स्वतः हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला असून त्याच्या बायोमध्ये तो स्वतःला लेखक आणि भारतीय म्हणून ओळखतो. या व्हिडिओने सोशल मीडियावर काही तासांतच धुमाकूळ घातला आहे. एका बाजूला अनेक हिंदू वापरकर्ते तन्वीरच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला काही मुस्लिम वापरकर्ते त्याच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. व्हिडिओमध्ये तन्वीर म्हणताना दिसतो, भारतातील मुस्लिमांना अनेकदा विचारलं जातं की तुमचे पूर्वज हिंदू होते का? पण आम्ही या सत्याकडे दुर्लक्ष करतो. इस्लाम हा एक स्वीकारलेला धर्म आहे, आणि आपल्या पूर्वजांनीही काळाच्या ओघात तो स्वीकारला. तो पुढे म्हणतो की हजरत मोहम्मद यांच्यासोबत इस्लाम स्वीकारणारे अनेक सहाबा जन्मतः मुस्लिम नव्हते. त्यांच्या कुटुंबातील लोक आधी इतर धर्माचे होते आणि नंतर त्यांनी इस्लाम स्वीकारला.
सौजन्य सोशल मीडिया
तन्वीर स्पष्टपणे सांगतो की यात लाज किंवा अपराधीपणाचे काहीही कारण नाही. उलट इतिहासाचा स्वीकार करणे हेच परिपक्वतेचे लक्षण आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, आपण वास्तवाला नाकारून काहीच साध्य करू शकत नाही. इस्लाम महान आहे कारण लोकांनी तो विचारपूर्वक स्वीकारला, जबरदस्तीने नाही. या विधानानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला. एका वापरकर्त्याने लिहिले, धर्मापेक्षा देश महत्त्वाचा आहे. तन्वीरने सत्य मांडले. तर दुसऱ्याने म्हटले, पहिल्यांदाच कोणीतरी भीतीशिवाय सत्य बोललं आहे. काही जणांनी मात्र या विधानाला धर्मविरोधी म्हटले आणि तन्वीरवर कारवाईची मागणी केली. सध्या या व्हिडिओला ९०,००० हून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत. हा मुद्दा आता केवळ धार्मिक न राहता सामाजिक चर्चेचा विषय ठरला आहे. इतिहासाच्या वास्तवाला सामोरे जाण्याचे धाडस कितीजण दाखवतात, हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.