सोयाबीनची आधारभूत दराने खरेदी सुरू करा

01 Nov 2025 16:22:08
हिंगणघाट,
Sudhir Kothari statement सोयाबीन बाजारात येऊन २० दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. परंतु, साधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीसाठी शासनाने तात्काळ खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केली आहे.
 

Sudhir Kothari statement 
केंद्र सरकारने Sudhir Kothari statement हंगाम २०२५-२६ करिता सोयाबीनची आधारभूत किंमत ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. सन २०२५-२६ या हंगामातील सोयाबीनची कापणी व मळणी साधारणतः ५ ऑटोबरपासून सुरू झाली आहे. सोयाबीनवर ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सोयाबीनला असलेल्या शेंगातील फत ३० दाणे पूर्ण भरणा झाल्यामुळे शेतमालाच्या प्रतीमध्ये मोठी तफावत आहे व त्याचा उत्पन्नावर परिणाम झाला असून साधारणतः एकरी दीड ते दोन क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत आहे. याचा शेतकर्‍यांना मोठा फटका बसत आहे. तसेच मजुरांच्या टंचाईमुळे सगळीकडे सोयाबीनची मशीनद्वारे हार्वेस्टिंग करून शेतकरी आपले सोयाबीन काढत आहेत. हार्वेस्टरमुळे शेतातील असलेल्या सोयाबीन सोबतच काडी कचरा सुद्धा हार्वेस्टरद्वारे कापल्या जात असल्यामुळे तसेच ओलाव्यामुळे सोयाबीनच्या फांद्या बहरल्या आहे व त्यामुळे सोयाबीनसह काडी कचरा सुद्धा सोयाबीनमध्ये येत आहे. सोयाबीन मळणीच्या वेळी झालेल्या अवकाणी पावसामुळे सोयाबीनची प्रत खराब झाली आहे. त्यामुळे समिती आवारात आवक होत असलेल्या सोयाबीनमध्ये मातेरा, काडीकचरा, कुजलेल्या, बुरशी लागलेल्या सोयाबीनचा समावेश असल्यामुळे सोयाबीनला खुल्या बाजारात आधारभूत दरापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे खुल्या बाजारात सोयाबीन या शेतमालाला मिळत असलेले दर लक्षात घेता शेतकर्‍यांनी आधारभूत दराने शासनास सोयाबीन विक्रीच्या दृष्टीने शासनाने तात्काळ खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे झाले आहे, अशी मागणी बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी एका निवेदनातून केली आहे.
बाजार समितीच्या कायद्यामध्ये असलेली तरतूद लक्षात घेता, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी जिल्हाधिकारी, सरव्यवस्थापक (नाफेड खरेदी), दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, मुंबई, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना सोयाबीन या शेतमालाची आधारभूत दराने खरेदी सुरू करण्याच्या दृष्टीने खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याबाबत विनंती केली
Powered By Sangraha 9.0