रिसोड,
sakharam maharaj vidyalaya महाराष्ट्र शासन अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धेत तालुयातील लोणी बु. येथील श्री सखाराम महाराज विद्यालयातील १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थी यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे ३० ऑटोबरला पार पडलेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत विजय मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेत पात्र झाले आहेत.
शालेय मैदानी खेळातील ४ बाय ४०० रिले प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेत अभिषेक आंधळे,अभिषेक गिते, अभिषेक काळेगावकर, सचिन आंधळे, सुरज पवार यांनी सहभाग घेतला होता. तर ४०० मी हार्डल्स खेळामध्ये अभिषेक गिते याने तृतीय क्रमांक पटकवित विद्यालयाला नावलौक प्राप्त करून दिले आहे. तर वेदांत लांडगे याने ५००० मीटर स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.या यशा बद्दल प्राचार्य कल्याण महाराज जोशी, सचिव सखाराम महाराज जोशी, अध्यक्ष गोविंद महाराज जोशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना गोविंद शर्मा यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.