श्रीकृष्ण जिनिंगमध्ये कापसाला ७ हजार १२१ भाव

10 Nov 2025 21:45:26
समुद्रपूर,

Shrikrishna Ginning Dhondgaon कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत येणार्‍या धोंडगाव येथील श्रीकृष्ण जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंगमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ सभापती हिंमत चतुर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कापसाला ७ हजार १२१ रुपये प्रतिविंटल भाव देण्यात आला. काटा पूजन संचालक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास कोटमकर यांनी केले. यावेळी जवळपास १ हजार विंटल कापूस खरेदी करण्यात आला. शेतकरी धनराज भुरे हिवरा यांचा बाजार समितीतर्फे संचालक शांतीलाल गांधी यांनी सत्कार केला.
 

Shrikrishna Ginning Dhondgaon 
या वर्षी झालेल्या अतिवृष्टी मुळे कापसाची प्रत खराब झाली असून ओलावा ही ३०-४० टके पर्यंत असल्याने खरेदीदाराला कापसाचे भाव देताना घाम सुटत आहे. यावेळी शंकर धोटे, जनार्धन कोल्हे, विष्णू खुरपुडे, कमल अरोरा, विशाल गोवारकर आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0