हिंगणघाट,
Soybean fire Hinganghat, तालुयातील सावली (सास्ताबाद) येथील शेतकर्याने दोन एकरातील कापलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञाताने आग लावली. सावली सास्ताबाद येथील शेतकरी पवन गुळघाणे यांनी त्यांच्या शेतातील दोन एकरातील सोयाबीन पिकाची कापणी शनिवारी केली होती. कापणी केलेल्या पिकाचा ढिग करून शेतातच ठेवला. रविवारी कापलेल्या सोयाबीनला थ्रेशर मशिनने काढण्याचा शेतकर्याचा बेत होता. मात्र, रात्री ११ ते पहाटे ३ वाजताच्या दरम्यान अज्ञाताने सोयाबीनच्या ढिगाला आग लावून पेटवून दिले. तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.