घराचे छप्पर कोसळल्याने एकाच कुटुंबातील ५ ठार

10 Nov 2025 09:15:36
दानापूर,
5 killed in same family बिहारमधील दानापूरमध्ये एका घराचे छप्पर कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना डायरा भागातील अकिलपूर पोलिस ठाण्याच्या नया पानापूर परिसरात घडली. मृतांच्या ओळखीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बबलू आणि त्याची पत्नी रोशन यांच्यासह त्यांच्या तीन मुल्या रुखसार, चांदनी आणि मुलगा चांद यांचा मृत्यू झाला.
 
5 killed in same family
 
 
माहितीनुसार, रविवारच्या रात्री कुटुंब झोपेत असताना अचानक छप्पर कोसळले. शेजाऱ्यांनी आवाज ऐकून लगेच पोलिसांना कळवले आणि दगड काढून कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की छत आधीच कमजोर झालेले होते आणि काही दिवसांपूर्वीच्या पावसामुळे ते अधिक जीर्ण झाले होते. त्यामुळे छप्पर भार सहन करू शकले नाही आणि कोसळले. पोलिसांनी अपघाताची सखोल चौकशी सुरू केली आहे आणि ते छप्पर का कोसळले याचा शोध घेत आहेत.
Powered By Sangraha 9.0