नगरपरिषद, नगरपंचायतसाठी आजपासून नामांकनाला सुरुवात

10 Nov 2025 09:23:02
अकोला,
Akola Municipal Council Election अकोला-तीन ते चार वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील तेल्हारा, आकोट, हिवरखेड, बाळापूर, मूर्तिजापूर या नगरपरिषद व बार्शीटाकळी नगरपंचायतीसाठी सोमवार १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.उमेदवारांना अर्ज ऑनलाइन भरून तो निवडणूक विभागाला सादर करावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यानुसार पाहिल्या टप्प्यात नगरपरिषद व नगरपंचायतचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
 
 
Akola Municipal Council Election
 
 
याशिवाय राजकिय पक्षाकडून देखील बैठकांचे सत्र सुरू आहे.यंदा नगराध्यक्ष पद जनतेतून असल्याने राजकीय पक्षांची देखील उमेदवारी देताना कसरत होत आहे. आरक्षणा मध्ये अकोट-नामाप्र महिला बाळापूर - नामाप्र महिला, हिवरखेड - नामाप्र महिला, तेल्हारा -अनुसूचित जाती महिला बार्शीटाकळी- सर्वसाधारण महिला, मूर्तिजापूर - सर्वसाधारण आरक्षण आहे.तर आजपासून उमेदवारी अर्ज सुरुवात झाली.तर नामनिर्देशनपत्रची अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबर, अपील नसलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मदुत- २१ नोव्हेंबर २०२५ अपील असलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर राहील.मतदान २ डिसेंबर तर मतमोजणी ३ डिसेंबरला होईल.
 
 
राजकीय पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरूच
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या वर्षात होणार हे निश्चित असलं तरी कोणत्या आधी होतील याबाबत संभ्रम होता.अखेर नगरपरिषद व नगरपंचायत च्या निवडणूक जाहीर झाल्याने पक्षाचा देखील गोंधळ उडाला आहे.उमेदवारी अर्जाला सुरुवात झाली तरी अजूनपर्यंत अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे देखील उमेदवार ठरले नाहीत
 
 
दुबार मतदारांना एकाच मताचा अधिकार
मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदारांच्या पुढे दोन स्टार करण्यात आले.संबंधित नावांच्या मतदारांचा शोध घेऊन ते कुठे मतदान करणार आहेत याची खातरजमा कर्मचारी करतील करतील व एक अर्ज सुद्धा त्याच्याकडून भरून घेणार आहेत.अशी माहिती नगरपरिषद प्रशासन अधिकारी डॉ विश्वनाथ वडजे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0