मृतदेहांची राखही झाली असुरक्षित!

10 Nov 2025 07:00:47
वेध...

ashes of dead bodies : स्वत:चा फायदा व्हावा याकरिता सोने, पैसा, बकऱ्या, गाई, म्हशी आणि सर्व प्रकारचे साहित्य चोरण्याचे काम चोरांच्या टोळ्या करतात. पण नागपूर जिल्ह्यात उमरेड गावात चक्क दोन मृतदेहांची राख चोरण्याचा अफलातून प्रकार घडला. परिणामी आता मृतदेहांची राखही असुरक्षित झाली की काय असाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसे पाहता मृतदेहांची राख अघोरी विद्या प्राप्तीसाठी केली जाते. पण प्रश्न हा पडतो की, मानवाने चंद्रासह मंगळावर जाण्याचा भीमपराक्रम केला असताना पृथ्वीतलावरील अंधश्रद्धाळू मात्र मृतदेहांची राख चोरून अघोरी विद्येसाठी का धडपडत आहेत.
 
 
 
vedh
 
 
 
 
विशेष म्हणजे ही अघोरी विद्या प्राप्त झाल्यावर संबंधित लोक त्याचा सदुपयोग करणार नाही हे शंभर टक्के खरे आहे. ते तर त्या अघोरी विद्येचा दुरुपयोगच करतील, हे शाश्वत सत्य आहे. पण अशा अघोरी विद्येची समाजाला खरोखरच गरज आहे का, याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. तसे पाहता विज्ञानवादी माणूस अंधश्रद्धा, अघोरी विद्येला मान्यता देतच नाही. तरीही मृतदेहांची राख चोरीला गेली हे शाश्वत सत्य नाकारून कसे चालणार आहे. विशेष म्हणजे राख चोरणाèयांना त्यातून युरेनियमचा साठा मिळणार आहे का? मग तरीही त्यांनी जळत्या चितेची राख चोरण्याचे धाडस केले, खरोखरच हा गुन्हा विचित्र आणि पोलिसांकरिता आव्हान ठरला आहे.
 
 
नागपूर जिल्ह्यातील उमरेड गावात सोमवार 3 नोव्हेंबर 2025 रोजी एका युवतीचा आणि इसमाचा मृत्यू झाला. त्यांच्यावर स्मशानभूमीत अन्त्यसंस्कार पार पडला. दुसèया दिवशी सर्व आप्तस्वकीय त्यांच्या रक्षासह अस्थी गोळा करायला गेले तेव्हा त्यांना तिथे काहीच दिसले नाही. त्या अन्त्यसंस्कार केलेल्या मृतदेहांची राख चोरांनी रातोरात चोरून नेली होती. पोलिसांकडे याविषयी तक्रार झाली. पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा कामाला लावली, पण नेमकी राख कोणी नेली याचा उलगडा करता आलेला नाही. यामुळे चोरांनी प्रथमत: स्मशानभूमी आणि परिसराची रेकी केली असावी, त्यानंतर त्यांनी मृतदेहांची राख चोरून नेली. गुन्हेगार गुन्हा करताना काही तरी पुरावे मागे सोडतात असे म्हणतात. पण राख चोरणाèयांनी असले पुरावे सोडलेले नाहीत.
 
 
मात्र खबऱ्यांना सक्रिय केले तर नक्कीच चोरांचा उलगडा लागणे कठीण नाही. याकरिता पोलिसांसह विज्ञानवादी विचारांच्या सामान्य लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अन्यथा अन्त्यसंस्कारानंतर रक्षा विसर्जनापासून ते दोघेही आयुष्यभर वंचित राहतील, हे मात्र खरे. चोरांनी तर चोरी करून यश संपादन केले, पण ज्यांच्या नातेवाईकांची राख चोरीस गेली त्या लोकांच्या भावनांचे काय? अघोरी विद्येसाठी धडपड करणाèयांनी माणुसकीच्या नात्याने का असेना आप्तस्वकीयांच्या भावनांचा विचार करायला हवा होता. पोटच्या मुलीचा अचानक मृत्यू ही घटना पचविणे कठीण आहे. त्या अवस्थेत तिची राखही चोरांनी चोरल्याने त्या आईवडिलांना काय वाटत असावे, याचाही विचार सुज्ञपणे व्हायला हवा. फक्त स्वत:चा स्वार्थ पूर्ण व्हावा म्हणून चोरांनी मृतदेहांची राख चोरून नेणे एवढ्यापुरता ही घटना मर्यादित नाही. यातून सामाजिक, भावनिक, धार्मिक असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याची उत्तरे समाजानेच शोधायला हवी.
 
 
 
समाजाने आता ‘करावे बरे। करावे खरे। कोणाच्याही मनावर। पाडू नये चरे।।’ ही वृत्ती अमलात आणायला हवी. आपल्या हातून अपराध घडला तर परमेश्वराला मानणारा भक्त स्वत: खजिल होतो. मग येथे राख चोरणाèयांना काहीच वाटू नये याचे आश्चर्य वाटते. अघोरी विद्येत एवढीच ताकद असेल तर मग त्याचा वापर पाकिस्तानच्या विरोधात करा ना? तिथे तर भारतीय सैन्यालाच दोन हात करावे लागतात. जिवंतपणी त्या मुलीसह इसमाने यातना भोगल्या. त्यांना मेल्यावर राख विसर्जनानंतर मोक्ष प्राप्तीचाही अधिकार चोरांनी हिसकावून घेतला. हे काही चांगले घडले नाही. ही बाब खटकणारी, संताप आणणारी शिवाय लोकांच्या भावनांचा अनादर करणारीच आहे. पण राखेची चोरी नेमकी कशाकरिता केली, याचा उलगडा व्हायला हवा. जिज्ञासू आणि विज्ञानवादी लोकांची हीच भावना असून, त्याचे खरे रूप समोर आले तरच बरे होईल. समाजानेही आता मृतदेहावर अन्त्यसंस्कार केल्यानंतर आपल्या व्यक्तीच्या राखेची दुसèया दिवशीपर्यंत सुरक्षा करावी. अन्यथा कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अन् भलतेच प्रश्न उद्भवतील.
- अनिल उमाकांत फेकरीकर
9822468660
Powered By Sangraha 9.0