नागपूर,
Diamond Nagar डायमंड नगर, सहकार नगर आणि न्यू सहकार नगर परिसरातील नागरिकांनी कचऱ्याच्या व्यवस्थेबाबत तक्रार केली आहे. या परिसरात आठ दिवसांत फक्त एकदाच कचरा गाडी येत असल्यामुळे घरांमध्ये कचरा मोठ्या प्रमाणात जमा होतो आहे. अधूनमधून पाऊस पडल्याने कचऱ्याचा वास परिसरात पसरत असून नागरिकांच्या तब्येतीवरही परिणाम होत आहे.
नागरिकांनी माजी नगरसेवक आणि झोनल कार्यालय नेहरूनगर यांच्याशी संपर्क साधला, तसेच नागपूर महानगरपालिकेच्या संपर्क क्रमांकावर तक्रार नोंदवली तरी समस्या अद्याप सुटलेली नाही. Diamond Nagar या परिस्थितीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत.
सौजन्य: अंशुल जिचकार, संपर्क मित्र